शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दासगावच्या शेतकऱ्यांचा शेतावरचा प्रवास होडीतून, भातलावणीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:32 IST

ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते.

- सिकंदर अनवारेदासगाव : ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते. मात्र, महाडमधील दासगावमधील भोई वाड्यातील शेतक-यांना त्यांच्या शेतावर जायचे असेल तर होडीतून प्रवास करत जावे लागते. गावापासून असलेल्या एका बेटावर असलेल्या जमिनीवर शेकडो एकर भात शेती आहे. याठिकाणी जाण्यासाठी सावित्रीचे पात्र ओलांडून जावे लागते.सध्या भातलावणीला सर्वत्र जोर असून जिकडे तिकडे भात शेतात लावणी करणारे शेतकरी, नांगर धरलेले शेतकरी दिसून येत आहेत. डोक्यावर भाताची रोपे घेवून शेतात काम करणारे शेतकरी सर्वत्र दिसत असले तरी तालुक्यातील दासगावमध्ये मात्र लावणीकरिता होडीतून प्रवास करणारे शेतकरी दिसून येतात. दासगाव हे पूर्वीचे बंदर असलेले गाव. सावित्री नदीच्या काठावर हे गाव असले तरी हा संपूर्ण परिसर खाडीपट्टा म्हणूनच ओळखला जातो. खाडीचे खारे पाणी या भागात शिरल्याने अनेक ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी जमिनीची झीज होवून या भागात बेट तयार झाले आहेत. दासगावमधील बाग नावाने एक बेट असून या बेटावर दासगावमधील भोईआळीतील शेतकºयांच्या जमिनी आहेत. जवळपास २० हून अधिक शेतकºयांच्या जमिनी याठिकाणी आहेत. ऐन पावसाळ्यात मात्र या शेतकºयांना आपल्या शेतावर जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. पाण्याचा प्रवाह असला तरी या होडीतूनच जीवघेणा प्रवास गेली अनेक पिढ्या सुरू आहे. बाग नावाचे हे बेट शिवकाळाआधीपासून अस्तित्वात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. याठिकाणी शिवकाळातील देखील वस्ती असावी असा निष्कर्ष येथे असलेल्या जुन्या विहिरी आणि दगडी वस्तूंवरून दिसून येत आहे.दासगावमधील भोईवाडीतील शेतकरी प्रतिदिन शेतावर भातलावणीसाठी लागणारे सामान, नांगर, दोºया, न्याहारी हे सर्व डोक्यावरून नव्हे तर सावित्रीच्या खळखळणाºया पाण्याच्या प्रवाहातून होडीतून प्रवास करत शेतावर जावे लागत आहे. येथील शेतकºयांनी शेतावर जाण्यासाठी छोट्या होड्या घेतल्या आहेत. या बेटावर शेकडो एकर भात जमीन असून भात पिकाबरोबरच उन्हाळ्यात विविध कडधान्ये घेतली जातात. या बेटाच्या चहुबाजूंनी सावित्री खाडीचे पाणी असल्याने पूर्वी कडधान्य मोठ्या प्रमाणावर येत असत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक पाण्याने जेव्हापासून खाडीचे पात्र बाधित झाले होते तेव्हापासून कडधान्याचे हे प्रमाण कमी झाले आहे. सध्या सुरू असलेल्या भात लावणीसाठी देखील तेथील विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे.येथील जमीन ही सखल असल्याने पाणी साचून राहत नाही. यामुळे जेव्हा पाऊस सुरू होतो त्या पावसाच्या पाण्यातच नांगरणी करून चिखल केला जात आहे.बेटावर असलेल्या घाणेकरीन मातेच्या आशीर्वादाने आजतागायत आम्हाला या बेटावर येताना कोणतीच अडचण आलेली नसल्याचे येथील ग्रामस्थ कृष्णा पडवळ यांनी सांगितले. या बेटावर घाणेकरीन मातेचे स्थान आहे. एका भल्या मोठ्या वृक्षाखाली हे स्थान असून शेतकºयांची अपार श्रद्धा आहे. प्रतिवर्षी या बेटावर येणारे शेतकरी देवीकडे होडीतून सुखरूप प्रवास आणि चांगली शेती याकरिता मनोभावे साकडे घालतात. देवीच्या या स्थानावर नमस्कार करूनच शेतकरी मग पुढे आपल्या शेतात कामाला लागतात.शिवकालीन विहिरीचा पाण्याकरिता वापरशिवकालीन बांधणीच्या येथे दोन विहिरी आहेत. दासगावमध्ये दौलतगड असल्याने याठिकाणी शिवकालीन वस्ती असल्यानेच या विहिरी बांधल्या गेल्या असाव्यात. एक विहीर ही गोलाकार तर दुसरी विहीर देखील गोलाकार असून विहिरीत जाण्यासाठी भुयारीमार्ग आणि पायºया बांधल्या गेल्या आहेत. उन्हाळ्यात याठिकाणी शेतकरी कडधान्य काढतात. चहुबाजूने पाणी असले तरी खाडीच्या पाण्याचा वापर अधिक होत नसल्याने या विहिरीच्या गोड्या पाण्याचा वापरच केला जातो. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हेच विहिरीतील पाणी वापरले जाते.चहुबाजूच्या पाण्याने जमिनीची होते धूपया बेटाच्या चहुबाजूला सावित्रीचे खाडीपात्र आहे. पावसाळ्यात येथील पाण्याला वेग असतो. प्रतिवर्षी आदळणाºया लाटांनी जमिनीच्या कडेची धूप होत आहे. जमिनीच्या कडेला असलेली माती दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. यामुळे या शेतकºयांच्या जमिनीच्या शेजारी संरक्षण भिंत असणे गरजेचे आहे. ज्यामुळे मातीची धूप कमी होवून शेतजमीन शाबूत राहील.आम्ही गेली अनेक पिढ्या होडीनेच आमच्या शेतात भातलावणीसाठी जात असतो. हे बेट कधी झाले हे आमच्या मागील पिढीला देखील ज्ञात नाही. मात्र, जोराच्या पावसात आम्हाला शेतावर जाणे धोकादायक वाटते. कधी कधी पाण्याचा प्रवाह अधिक असला तर याठिकाणी जाणे शक्य होत नाही.- विनोद पडवळ, शेतकरीआमच्या गावातील भोईवाडीतील शेतकरी बेटावर शेती करण्यासाठी होडीतून जातात. या बेटावर शेकडो एकर जमीन असून याठिकाणी जाण्याकरिता पुलाची व्यवस्था झाल्यास विविध प्रकारची शेती करता येणे शक्य आहे. शिवाय या बेटाचा विकास होऊन शेतकºयांना देखील फायदा होणार आहे- दिलीप उकीर्डे, सरपंच दासगाव

टॅग्स :Raigadरायगड