रेवदंडा शहरात वाहतूककोंडीची समस्या
By Admin | Updated: May 10, 2017 00:19 IST2017-05-10T00:19:15+5:302017-05-10T00:19:15+5:30
रेवदंडा-अलिबाग मुख्य हमरस्त्यावर बाजारपेठ असून येथील रस्ता अरुंद आहे, तसेच येथे दुतर्फा हातगाड्या व्यावसायिकांचे वाढते प्रमाण

रेवदंडा शहरात वाहतूककोंडीची समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
रेवदंडा : रेवदंडा-अलिबाग मुख्य हमरस्त्यावर बाजारपेठ असून येथील रस्ता अरुंद आहे, तसेच येथे दुतर्फा हातगाड्या व्यावसायिकांचे वाढते प्रमाण, गावात भाजी मार्केट नसल्याने मुख्य रस्त्यावर पंचक्र ोशीतील महिला भाजी, फळे, रानमेवा विक्रीसाठी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी ही समस्या जटील रूप धारण करत आहे. याचा सर्वात मोठा फटका पादचारी वर्गाला बसत आहे. काही दुकानदारांनी विक्र ी करण्याच्या वस्तू रस्त्यावर थाटल्याने वाहतूक सुरळीत चालू राहण्यास अडथळा ठरत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.
मुरुड-जंजिरासारख्या प्रति गोवा मानल्या गेलेल्या ठिकाणी बारमाही येणाऱ्या पर्यटकांना याच हमरस्त्यावरून जावे लागते. पंचक्र ोशीतील सुमारे ७० गावातील नागरिकांना रेवदंडा येथे बँक, पोलीस ठाणे,वैद्यकीय सेवा तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा घेण्यासाठी यावे लागते. अनेक नागरिक स्वत:चे वाहन घेऊन येतात, मात्र अरुंद रस्ते व गावात अधिकृत कुठेच वाहनतळ नसल्याने ही वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. मग बाजारपेठेत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीत सर्वात जास्त फटका बसतो तो मुरुड-जंजिरा व अलिबाग आगारातील बसला. वाहतूक कोंडीत बस अडकल्या की त्यांना नियोजित स्थानकात पोचण्यासाठी उशीर होतो. पर्यायाने बसचे वेळापत्रक कोलमडते, याचा अनुभव दररोज प्रवासी घेत असतात. रस्त्यावर वाढणारे हातगाडी विक्रे ते यांच्यावर ग्रामपंचायतीने पोलीस खात्यामार्फत कारवाई केली, अनेक ग्रामसभांमध्ये याविषयी चर्चा झाली, मात्र कायमस्वरूपी प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.