रसायनी वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा

By Admin | Updated: December 17, 2015 23:20 IST2015-12-17T23:20:32+5:302015-12-17T23:20:32+5:30

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु वात केली असून डं्रक अँड ड्राईव्हअंतर्गत रसायनी, खालापूर व खोपोली वाहतूक पोलिसांनी संयुक्तकारवाई केली.

The traffic of the traffic police | रसायनी वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा

रसायनी वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा

मोहोपाडा : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु वात केली असून डं्रक अँड ड्राईव्हअंतर्गत रसायनी, खालापूर व खोपोली वाहतूक पोलिसांनी संयुक्तकारवाई केली.
रसायनी पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायझर्स मशिनद्वारे सॅन्ट्रो कार एमएच-१४,एम-४७२८ च्या वाहनचालकाची तपासणी करून नशेत सापडलेल्या एकावर कारवाई केली. त्याच्यावर कारवाई करून कोर्टात हजर केले असता मद्यप्राशन करून वाहन चालविल्याबद्दल त्याला दोन हजारांचा दंड ठोठावला. वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांवर रसायनी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरात धूमस्टाईल मोटारसायकल चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई रसायनी वाहतूक शाखेचे एएसआय रायसिंग वसावे, पो.काँ.विजय पाटील, संदीप पाटील, विजय टेमघर आदिंनी केली. (वार्ताहर)

Web Title: The traffic of the traffic police