शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

रुग्णांसाठी टोल फ्री क्रमांकाची सेवा; डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमधील संघर्षाला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 04:33 IST

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये सातत्याने होणा-या संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे. रु ग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यास १०४ या टोल फ्रीक्र मांकावर फोन करायचा आहे.

- आविष्कार देसाई 

अलिबाग : सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये सातत्याने होणाºया संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे. रु ग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यास १०४ या टोल फ्रीक्र मांकावर फोन करायचा आहे. पुढील काही कालावधीमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होऊन ड्युटीवर गैरहजर असलेल्या डॉक्टरांना कारवाईचा डोस पाजण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. १ नोव्हेंबरपासून या सेवेला राज्यभरात सुरुवात होणार आहे.सरकारच्या या उपायामुळे ड्युटीवरील डॉक्टरांवर चांगलाच वचक बसण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते. ग्रामीण, तालुका आणि जिल्हास्तरावरील सरकारीरु ग्णालयांमध्ये सरकारी सेवेत असणारे बहुतांश डॉक्टर हे आपापल्या प्रायव्हेट प्रॅक्टीस करण्यामध्ये मश्गूल असल्याचे दिसून आले आहे. प्रायव्हेट प्रॅक्टीस तर, दुसरीकडे सरकारी पगार असे डॉक्टरांचे दोन्ही हात तुपात असतात. परंतु त्यामुळे तासन्तास रु ग्णांना सरकारीरु ग्णालयामध्ये डॉक्टरांसाठी ताटकळत बसावे लागते. वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे रु ग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये संघर्ष होत असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे.शवविच्छेदन तत्काळ करायचे आहे, रुग्णांना उपचारासाठीरुग्णालयात घेऊन गेला आहात, काहीतरी इमर्जन्सी आहे, महिलांची प्रसूती आहे, बाळ आजारी आहे आणि प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नाहीत. अशा वेळीरु ग्णाने किंवा रु ग्णाच्या नातेवाइकाने आता १०४ या टोल फ्री क्र मांकावर कॉल करून आपली तक्र ार नोंदवायची आहे. हा कॉल पुण्यामध्ये उभारलेल्या कंट्रोल रु मशी जोडला जाणार आहे. तेथे २५ कर्मचारी चोवीस तास नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याजवळ राज्यातील सर्व ग्रामीण आणि प्राथमिक रुग्णालयातील डॉक्टरांचे नाव आणि संपर्क नंबर असणार आहेत.अवघ्या काही सेकंदांत संबंधित रु ग्णालयामध्ये कोणत्या डॉक्टराची ड्युटी आहे, ते सध्या कोठे आहेत याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर संबंधित डॉक्टरांना तातडीनेरु ग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या सेवेत डॉक्टरांनी कामचुकारपणा केला तर वरिष्ठांना माहिती देऊन संबंधित डॉक्टरांवर तातडीने कारवाई केली जाणारआहे.विशेष म्हणजे प्रत्येक आलेला कॉल हा रेकॉर्ड केला जाणार आहे. प्रत्येक घडामोडीची माहिती संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनाही दिली जाणार आहे. या सुविधांमुळे राज्यामध्ये आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.डॉक्टरांनी रु ग्णालयात थांबलेच पाहिजे यासाठी सरकारने आतापर्यंत विविध उपाय करून पाहिले आहेत.मात्र डॉक्टरांनी त्यामध्ये पळवाटा शोधण्याचे काम केल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.दैनंदिन हजेरी असो अथवा बायोमेट्रिक पद्धती या सपशेल फोल ठरल्याने कामचुकार डॉक्टरांचे चांगलेच फावत होते.आता मात्र या नव्या उपाययोजनेमुळे त्याला चाप बसणार आहे.1811महाराष्ट्रात प्राथमिकरु ग्णालये387ग्रामीणरु ग्णालये आहेत५० बेडची५६ उपजिल्हारु ग्णालये आहेत१०० बेडची२५ उपजिल्हारु ग्णालये आहेत४ सामान्य रु ग्णालये आहेत. ११ महिला रु ग्णालये तर २३ जिल्हा रु ग्णालये आहेत104येथील डॉक्टरांचा कंट्रोल रूमशी संपर्क असणार

टॅग्स :hospitalहॉस्पिटल