शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

१५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 6:51 AM

रायगड जिल्ह्यातील १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.शनिवारी प्रत्येक तहसील कार्यालयात मतदान यंत्रे व साहित्य वाटप करण्यात आले असून कर्मचारी व निवडणूक अधिकारी ५६२ मतदान केंद्रांवर वाहनांतून रवाना झाले आहेत.अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर १८७ ग्रामपंचायतींपैकी ३९ सरपंचपद ेतर एक हजार ६४७ पैकी ५५३ सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. जिल्ह्यातील सरपंच आणि सदस्यपदांच्या एकूण १ हजार १४४ जागांवर प्रत्यक्ष निवडणूक होणार असून २ हजार ५८२ उमेदवारांची लढत होणार आहे.मतदान रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी५.३० वाजेपर्यंत होणार आहे. एकूण ५६२ मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर अधिकारी व कर्मचारी असे एकूण ३ हजार ६७२ कर्मचारी कामकाज पाहणार आहेत. कर्मचारी जाण्यासाठी व मतदान यंत्र घेऊन येण्यासाठी शासकीय वाहने, खाजगी शाळेच्या बसेसचा वापर करण्यात येत आहे. मतदान प्रक्रि या पार पडल्यानंतर मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती निवडणूक विभागामार्फत देण्यात आली आहे.जिल्ह्यात मतदान प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी होमगार्ड व पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात ९८ अधिकाऱ्यांसह ७५३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तावरील या कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी १०७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.बंदोबस्तांमध्ये २७६ होमगार्ड, ८० आरपीसी तर अन्य १०७ कर्मचाºयांचा समावेश आहे. सहा स्ट्रायकींग फोर्स तुकड्यांसह एकूण ७५४ पोलीस कर्मचारी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.मतदारांमध्ये निर्भयतेचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता रेवदंड्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी पोलिसांचे पथसंचलन झाले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक