शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकाराच्या उंबरठ्यावर; विद्यार्थ्यांसाठी आव्हान तर शिक्षकांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:29 IST

अगोदर कोरोनाचे संकट व नंतर चक्रीवादळाचे संकट या दोन्ही बाबींमुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षणासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संतोष सापते

श्रीवर्धन : व्यक्ती विकासामध्ये शिक्षणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असते. शिक्षण हे व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पाडण्यातील महत्त्वाचे अवजार आहे. भारतीय समाज मन प्रगल्भ, जागृत, संवेदनशील, तसेच सजग करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. काळानुरूप शिक्षण पद्धतीमधील स्थित्यंतर आपण पाहात आला आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकाराच्या उंबरठ्यावर आज आपण उभे ठाकलो आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

जीवनात घडलेल्या बदलांचा स्वीकार करून, त्याद्वारे अध्ययन व अध्यापन प्रगल्भ करण्याचे काम शिक्षकरूपी गुरुजनांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे. आजमितीस पुन्हा एकदा शिक्षणाच्या नव्या अध्यायास सुरुवात होत आहे. कोरोनामुळे शिक्षण पद्धतीमध्ये निश्चितच काही निर्णायक बदल घडणार आहेत. आगामी काळामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील अंतर वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी शिक्षणाविषयी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे आॅनलाइन शिक्षण हा पर्याय एकमेव आहे, असे निश्चितच नाही. शिक्षणाविषयी विविध मार्ग, पर्याय आजही उपलब्ध होऊ शकतात. त्यानुसार, जागृत पालकाने पुढाकार घेणे अगत्याचे आहे. कारण आज प्रत्येक घरातील शिक्षित आणि सुशिक्षित वर्गाची संख्या निश्चितच वाढलेली आहे. कोरोनामुळे घरात एक तरी व्यक्ती मुलांच्या नियमित सान्निध्यात राहू शकतात. घरात आई, बाबा, दादा कुणीतरी एक व्यक्ती घरात जर वेळ काढू शकला, तर मुलांचे शिक्षण निश्चितच सुरळीतपणे चालू शकते. नाहीतर तसेही खासगी शिकवणीला फक्त मुलांना रट्टा मारायला, घोकंमपट्टी करायला शिकवलं जातं ते निदर्शनात आलेला आहे. आज जवळपास सर्व शालेय पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झालेली आहेत. त्यानुसार, पालकाने पुस्तक खरेदी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे. आॅनलाइन शिक्षण पद्धतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होईल, असे वाटत नाही. नेटवर्कमधील अडचणी, घरातील आर्थिक गणित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षणामधील उत्साह आवश्यक आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्याला मोकळं वातावरण, समवयस्क मित्र, प्रशिक्षित व मनमिळावू शिक्षक वर्ग या सर्व बाबी उपलब्ध असतात, तसेच अध्ययन व अध्यापन करत असताना शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील ह्युमन टच हा शिक्षणासाठी निर्णायक असतो. आॅनलाइन शिक्षणामध्ये असे घडत नाही. त्याचप्रमाणे, सातत्याने डिजिटल शिक्षण घेताना मोबाइलचा अति वापर झाल्याने पाठ, मान, डोळे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे.अगोदर कोरोनाचे संकट व नंतर चक्रीवादळाचे संकट या दोन्ही बाबींमुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षणासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझा मुलगा इयत्ता नववीच्या वर्गात आहे. तो अभ्यासासाठी मोबाइल घेऊन बसतो. मात्र, थोड्या वेळातच त्याचे लक्ष विचलित होऊन तो मोबाइलमधील इतर अ‍ॅप्स चालू करतो. त्यामुळे मी व माझी पत्नी नियमित जवळपास दोन तास बसून पाठ्यपुस्तकातील दोन दोन प्रकरणे वाचून घेतो व नंतर त्याला समजावून सांगतो, असे पालक संदीप आव्हाड यांनी सांगितले.सद्य:स्थितीत कोरोनामुळे शिक्षणात अनेक बदल होणार आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे आमचे दायित्व असेल, त्यानुसार आम्ही आमचे दायित्व पूर्ण करणार आहोत. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊ.- घनश्याम गायकवाड, शिक्षक, नगर परिषद, श्रीवर्धन

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी