दोन दुचाकींच्या धडकेत तीन तरुण गंभीर जखमी

By Admin | Updated: January 14, 2017 06:52 IST2017-01-14T06:52:01+5:302017-01-14T06:52:01+5:30

म्हसळा तालुक्यातील मौजे खारगाव बुद्रुक येथे १२ जानेवारी रोजी रात्री पिकअप वाहनाला ओव्हरटेक करताना दोन दुचाकीस्वारांची

Three youths seriously injured in two wheelers | दोन दुचाकींच्या धडकेत तीन तरुण गंभीर जखमी

दोन दुचाकींच्या धडकेत तीन तरुण गंभीर जखमी

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील मौजे खारगाव बुद्रुक येथे १२ जानेवारी रोजी रात्री पिकअप वाहनाला ओव्हरटेक करताना दोन दुचाकीस्वारांची धडक झाल्याने तीन तरु ण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका तरु णाला मुंबई येथे तर दोन तरु णांना अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
कांदळवाडा येथील एक युवक दिलीप बागवे मोटारसायकल घेऊन म्हसळा येथून निघाला असता खारगाव ग्रामपंचायत हद्दीत आल्यानंतर वाशी येथून निघालेल्या चंद्रकांत धुरे व सोबत असलेला संतोष या दुचाकीस्वारांची पिकअप वाहनाला ओव्हरटेक करताना समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दिलीप बागवे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला मुंबईतील रु ग्णालयात दाखल केले. तर चंद्रकांत धुरे व संतोष या युवकांच्या डोक्याला मार लागला. घटना घडल्यानंतर म्हसळात एकही रुग्णवाहिका मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Three youths seriously injured in two wheelers