शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

नोकरीच्या बहाण्याने तरुणांची कोट्यवधींची फसवणूक, पोयनाडसह पेणमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:53 PM

रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील २०० पेक्षा अधिक तरुणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोयनाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

-जयंत धुळपअलिबाग : रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील २०० पेक्षा अधिक तरुणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोयनाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २८ मार्च रोजी प्रसिद्ध केल्यावर फसवणूक झालेले तरुण पुढे येऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू लागले.पेण पोलीस ठाण्यात याच फसवणूक प्रकरणात शुक्रवारी विनोद पाटील या तरुणाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पेणमधील पिंपळपाडा येथील शशिकांत रामदास पाटील यास अटक केली. त्यास न्यायालयाने सोमवार, १३ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पेण पोलीस निरीक्षक व्ही.एस.धुमाळ यांनी दिली.२८ डिसेंबर २०१७ रोजी पिंपळपाडा(पेण) येथे शशिकांत रामदास पाटील (पिंपळपाडा, ता.पेण), कृष्णकांत विद्याधर पाटील (भाल, ता.पेण) आणि सचिन जगन्नाथ पाटील (रा.कुरकुंडी कोलटेबी, ता.अलिबाग) या तिघांनी रेल्वेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तसेच बनावट मुलाखत पत्र, कार्यालयीन आदेश आणि नियुक्ती पत्र देऊन विनोद पाटील (रा.पिंपळपाडा,ता.पेण) यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये, ऋषिकेश परशुराम पाटील (रा. पिंपळपाडा पो. कोप्रोली, ता.पेण) यांच्याकडून ३ लाख, प्रणित रमेश म्हात्रे (रा. फ्लॅट क्र. १३ विष्णू नगर पेण) यांच्याकडून १० लाख आणि रोहन चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून ३ लाख असे मिळून एकूण २३ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.याप्रकरणी विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून शशिकांत रामदास पाटील (पिंपळपाडा, ता.पेण) यास पेण पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. तर कृष्णकांत विद्याधर पाटील आणि सचिन जगन्नाथ पाटील यांचा शोध पेण पोलीस निरीक्षक व्ही.एस.धुमाळ हे घेत आहेत. दरम्यान, तिघांना आम्ही पैसे देताना त्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले असून ती सी.डी. पुरावा म्हणून पेण पोलिसांना सादर केली असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.पोयनाडमध्ये ४५ तरुणांची २ कोटी ९० लाख ९५ हजारांची फसवणूकपोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणारे सचिन जगन्नाथ पाटील यांनी फसवणूक करणाºया या सहा जणांमध्ये गोविंद शिवाजी शिर्के (रा.कामोठे,नवी मुंबई), वनिता डी.गोरे, ब्रिजेश मिश्रा (दोन्ही रा.बोरीवली,मुंबई), अनिल पाटील, देवांग चुरी (रा.चर्चगेट,मुंबई) आणि जीवन पाटील (रा.उरण) यांचा समावेश असल्याची माहिती दिली.फसवणूक झालेल्या एकूण तरुणांपैकी ४५ बेरोजगार तरुणांच्या वतीने आपण ही फिर्याद दाखल करीत असल्याचे नमूद केले आहे. फसवणूक झालेल्या ४५ तरुणांची तब्बल २ कोटी ९० लाख ९५ हजारांची ९ आॅक्टोबर २०१६ ते २५ मार्च २०१९ या सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीत फसवणूक झाल्याचे पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी