शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

रायगडमध्ये यंदाही भाजपचे स्वप्न अधुरेच, १९८९ मध्ये कुलाबा मतदारसंघातून एकदाच लढवली होती निवडणूक

By राजेश भोस्तेकर | Published: April 03, 2024 12:58 PM

- राजेश भोस्तेकर  अलिबाग : लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये भाजप रिंगणात उतरेल, असे दिसत होते. त्यांनी तशी तयारीही केली होती. ...

- राजेश भोस्तेकर अलिबाग : लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये भाजप रिंगणात उतरेल, असे दिसत होते. त्यांनी तशी तयारीही केली होती. मात्र, मित्रपक्षांच्या वाटाघाटीत त्यांना विद्यमान खासदार म्हणून ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडावी लागली. त्यामुळे रायगडमध्ये कमळ फुलविण्याचे भाजपचे स्वप्न महायुतीमुळे भंग पावले आहे. आताचा रायगड मतदारसंघ हा पूर्वी कुलाबा मतदारसंघ असताना फक्त एकदा १९८९ मध्ये भाजपने नरेश जाधव यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ६१ हजार ३८३ मते मिळाली होती. 

कुलाबा लोकसभा लोकसभा मतदार संघ हा १९६२ ते २००८ पर्यंत अस्तित्वात होता. पनवेल ते पोलादपूर असा १५ तालुक्यांचा हा मतदारसंघ होता. २००८ साली कुलाबा हे नाव बदलून रायगड लोकसभा मतदार संघ निर्माण झाला. त्यात  रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघ जोडण्यात आले; तर पनवेल, उरण, कर्जत खालापूर हे विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभेला जोडण्यात आले. १९६२ ते २०१९ पर्यंत १७ लोकसभा निवडणुका झाल्या असून, २०२४ मध्ये  ही १८वी लोकसभा होत आहे. 

कुलाबा लोकसभा मतदारसंघ असताना १९८९ मध्ये पहिल्यांदा भाजपने नरेश जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. भाजपविरोधात काँग्रेसचे बॅरिस्टर ए. आर. अंतुले, शेकापचे दि. बा. पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यात काँग्रेसचे ए. आर अंतुले याना ३ लाख ३३ हजार ९५०, शेकापचे दि. बा. पाटील यांना २ लाख १८ हजार ५१६; तर भाजपचे नरेश जाधव यांना ६१ हजार ३८३ मते पडली होती. अंतुले हे विजयी झाले होते. 

महायुतीमुळे समीकरणे बदलली आणि...१९९० मध्ये शिवसेना-भाजप युती झाली. त्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेला. २०१९ मध्ये राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप रायगडची जागा लढवेल अशी शक्यता होती. त्यानुसार भाजपने मतदारसंघात मोर्चेबांधणीही केली होती. मात्र भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट अशी महायुती झाली. त्यात विद्यमान खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जागा सुटली.

टॅग्स :BJPभाजपाraigad-pcरायगडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४