कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांना त्यांनी दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 02:44 IST2020-05-16T02:44:10+5:302020-05-16T02:44:49+5:30

देशभरात सुरू असलेले कोरोना विषाणूचे थैमान आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

They gave a helping hand to those who were in financial trouble because of Corona | कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांना त्यांनी दिला मदतीचा हात

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांना त्यांनी दिला मदतीचा हात

खोपोली - देशभरात सुरू असलेले कोरोना विषाणूचे थैमान आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोजगार नसल्याने अनेकांना जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण झाले आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी आता काही संस्था समोर येत आहेत. सेंट्रम मायक्रोक्रेडिट लिमिटेडच्या सेंट्रम फाऊंडेशननेही सामाजिक बांधिलकी जपत खोपोलीजवळील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देत त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

Web Title: They gave a helping hand to those who were in financial trouble because of Corona