Kinshuk Vaidya: अभिनेता किंशुक वैद्यच्या रिसॉर्टचा दरवाजा तोडला, रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:49 IST2023-06-28T09:49:14+5:302023-06-28T09:49:27+5:30

Kinshuk Vaidya: दूरदर्शनवरील ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेत संजूची भूमिका करून लोकप्रिय झालेला अभिनेता किंशुक वैद्य याच्या अरेरावीविरुद्ध नागावातील ग्रामस्थ एकवटले आहेत.

The door of actor Kinshuk Vaidya's resort was broken, the villagers gathered as the road was blocked | Kinshuk Vaidya: अभिनेता किंशुक वैद्यच्या रिसॉर्टचा दरवाजा तोडला, रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ एकवटले

Kinshuk Vaidya: अभिनेता किंशुक वैद्यच्या रिसॉर्टचा दरवाजा तोडला, रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ एकवटले

अलिबाग - दूरदर्शनवरील ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेत संजूची भूमिका करून लोकप्रिय झालेला अभिनेता किंशुक वैद्य याच्या अरेरावीविरुद्ध नागावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. वहिवाटीचा असलेला रस्त्यावर बांधलेल्या त्याच्या रिसॉर्टचा लोखंडी दरवाजा रविवारी जेसीबीने तोडून टाकण्यात आला. त्याविरुद्ध मेघा वैद्य यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

जेसीबीचे चालक रामतील गुप्ता  व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   जागेच्या वादावर वैद्य कुटुंबीय व ग्रामस्थ यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या अरेरावीमुळे ग्रामस्थांनी रविवारी हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येते. किंशुक वैद्यचे नागावात  वडिलोपार्जित वारसा रिसाॅर्ट आहे.  दोन वर्षांपूर्वी त्याचे बांधकाम करुन तो व्यावसायिक पद्धतीने चालविला जातो. त्याच्या मालकीच्या जागेतील काही जागा ‘गवड’ म्हणून रहदारीसाठी सोडण्याची सात बारावर नोंद आहे. मात्र त्यावरुन वैद्य कुटुंबीय ग्रामस्थांना नेहमी त्रास देतात,  त्या जागेचा वापर करु नये, यासाठी तेथे खड्डा पाडून ठेवण्यात आला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाण्यायेण्याच्या आडवे येणाऱ्या मार्गात येणारे लोखंडी ग्रील जेसीबीने तोडून टाकले. 

किंशुक वैद्यच्या आईने  त्याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जेसीबीने दरवाजा तोडत असल्याचे  सीसीटीव्ही  फुटेज पोलिसांना दिले आहेत. याबाबत सर्व कागदपत्रांची छाननी करून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगितले.

संबंधित जागा वहिवाटीसाठी सोडण्याची नोंद ‘सातबारा’वर आहे. मात्र वैद्य कुटुंबीय त्याचा वापर कोणालाही करू देत नाही.  वरिष्ठांकडून दबाव आणून ग्रामस्थांना त्रास दिला जात आहे. जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात आहेत. याबाबत आम्ही लवकरच जिल्हाधिकारी व पोलिसप्रमुखांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार आहोत. 
- हर्षदा मयेकर
सदस्य, नागाव ग्रामपंचायत

Web Title: The door of actor Kinshuk Vaidya's resort was broken, the villagers gathered as the road was blocked

टॅग्स :Raigadरायगड