ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना लाडू वाटून जिल्हा पोलिस अधीक्षक केला गोड

By निखिल म्हात्रे | Updated: April 9, 2024 23:51 IST2024-04-09T23:51:27+5:302024-04-09T23:51:39+5:30

त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

The District Superintendent of Police pampered the employees on duty | ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना लाडू वाटून जिल्हा पोलिस अधीक्षक केला गोड

ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना लाडू वाटून जिल्हा पोलिस अधीक्षक केला गोड

अलिबाग - सणाच्या दिवशी आपले कर्तव्य बजावित ड्युटीवर असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी लाडू वाटून गुढीपाडव्याचा सण गोड केला. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

दिवसभर कामाच्या ताणातून क्षणभर विश्रांती मिळावी, तसेच त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे या भावनेने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रत्येक शाखेत जाऊन, तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोड लागु देत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस विभागात पहील्यांदाच असा सण साजरा करण्यात आला. यातुन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील ऋणानुबंध दिसुन आले.

तोंडावर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था, याबरोबरच चोख बंदोबस्त ठेवण्यात पोलिस विभाग व्यस्त असल्याने त्यांना सण साजरा करता येत नाही हे जाणून पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संकल्पना जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी राबविली.

Web Title: The District Superintendent of Police pampered the employees on duty