शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:26 IST

२४ तासांनंतरही ढिगारे जैसे थे, हुंदका अन् आक्रोशाने आसमंत हळहळला

जमीर काझी

इर्शाळवाडी (जि. रायगड) : वार बुधवार. रात्रीचे ११ ते ११:३० वाजलेले... आदिवासी पाड्यावर कोसळत्या पावसात अन् गार वाऱ्यात ४९ कुटुंबं गाढ झापेत होते... तेवढ्यात मातीचा मोठा ढिगारा डोंगरावरून घरंगळत आला अन् त्याने अर्ध्याहून अधिक गाव गिळले. मदतीसाठी हाक देण्याचीही अनेकांना संधी मिळाली नाही.. १६ जणांना या दरडीने गिळले...

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मृत्यूचा हा डोंगरच कोसळला. दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले. 

नेमके काय घडले?मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली.किती मोठा थर?दरडी कोसळून घरांवर सुमारे ३० ते ३५ फुटांचा दगड-मातीचा थर साचला आहे. त्यामुळे हा ढिगारा काढणे सद्य:स्थितीत अशक्यप्राय बनले आहे.

मदतकार्यात प्रचंड अडथळे घटनास्थळी पोहोचल्यावर एनडीआरएफच्या जवानांशिवाय अन्य कोणातही मदत करण्याची ताकद उरली नव्हती. अन्य बचाव पथक व औद्योगिक कारखान्यातून मागविण्यात आलेल्या मजूर वर्ग यांच्याकडील साधनेही अपुरी पडत होती. ही वाडीवर पोहोचण्यास निसरडी पायवाट, कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. 

पायथ्याशी नियंत्रण कक्षn घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. n खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

 

 

बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार लोकमत न्यूज नेटवर्क । अलिबाग (जि. रायगड) : बचावकार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्यास प्राधान्य  दिले जात असून, त्याचे नियोजन  झाले आहे.  कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले. दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती; परंतु, ती खराब हवामानामुळे पोहोचू शकलेली नाहीत, असे ते म्हणाले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित आहेत. अधिकारी, बचाव पथकाच्या संपर्कात मी रात्रीपासून होतो, असे शिंदे यांनी सांगितले. बचावकार्य करणारे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. येथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे. यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. 

टॅग्स :RaigadरायगडEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री