श्रीवर्धनवरून मुंबईला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; १६ प्रवासी जखमी, रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 15:01 IST2022-05-16T14:54:57+5:302022-05-16T15:01:23+5:30
महामंडळाच्या बसमध्ये तब्बल ३० प्रवासी होते.

श्रीवर्धनवरून मुंबईला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; १६ प्रवासी जखमी, रुग्णालयात दाखल
रायगड- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन आगरातील बागमांडले येथून सकाळी १०:१५ वाजता सुटणाऱ्या एम. एच. १४ बीटी २७३८ गाडीचे ब्रेक फेल झाल्याने साखरोने फाटा येथे भीषण अपघात झाला असून गाडीवर कार्यरत असणाऱ्या चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला आहे.
महामंडळाच्या बसमध्ये तब्बल ३० प्रवासी होते. त्यापैकी १६ प्रवाशी जखमी झाले असून उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे त्यांना हलवण्यात आले आहे. यातील तीन ते चार प्रवाशाना गंभीर दुखापती झाल्याची माहिती मिळते.