शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सुरेश लाड यांची राजीनाम्याची तलवार तिसऱ्याच दिवशी म्यान, खासदार सुनील तटकरे यांची मनधरणी आली फळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 5:44 PM

Raigad News: रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे माजी आमदार सुरेश लाड यांचे बंड तिसऱ्या दिवशी थंड झाले आहे.

- विजय मांडे  कर्जत - रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे माजी आमदार सुरेश लाड यांचे बंड तिसऱ्या दिवशी थंड झाले आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत,नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असे खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले. तटकरे यांनी लाड यांची नाराजी दुर करताच लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पुन्हा आपल्या खांद्यावर घेत असल्याचे जाहिर केले. थोडक्यात म्हणायचे झाले तर लाड यांनी आपली राजीनाम्याची तलवार म्यान केली आहे.

23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पाठवून दिला होता. आज २५ नोव्हेंबर रोजी सुरेश लाड यांना सोबत घेऊन काही प्रमुख पदाधिकारी पनवेल येथे पोहचले. पनवेल येथील एका हॉटेल मध्ये सुनील तटकरे, सुरेश लाड यांच्यात बैठक झाली. त्यावेळी सुरेश लाड यांच्या सर्व बाबीं समजून घेत सुनील तटकरे यांनी आगामी काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्या - त्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले. आगामी काळात रायगड जिल्हयातील नगरपंचातींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि रायगड जिल्हा परिषद तसेच १५ तालुका पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. ते लक्षात घेता निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा अध्यक्ष बदलला जाणे हे पक्षाला परवडणारे नाही तसेच कार्यकर्त्यांची निवडणुका लढण्याची उमेद हरवून जाईल आणि म्हणून लाड यांनी पुन्हा जिल्हा अध्यक्ष पदावर काम करावे, अशी सूचना सुनील तटकरे यांनी तेथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरेश लाड यांना केली. यावेळी जेष्ठ नेते हनुमंत पिंगळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, जिल्हा राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष अंकित साखरे, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे, खालापुर तालुका अध्यक्ष नरेश पाटील, माजी तालुका अध्यक्ष एच के पाटील, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष बैलमारे तसेच शरद लाड, संदीप मुंढे, कैलास घारे आदी उपस्थित होते.

सुरेश लाड यांची जिल्हा अध्यक्ष पदावर पुन्हा काम करण्याची मनधरणी करण्यात यशस्वी झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले. तटकरे आणि सुरेश लाड म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा सर्वाना अनुभवायला मिळाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार असलेले सुरेश लाड शिवसेनेच्या वाटेवर जात असल्याचे समजताच रात्रीचा दिवस करून तटकरे हे लाड यांच्या भेटीला पाेचले हाेते. सुखम हॉस्पिटलमध्ये  जाऊन तटकरे यांनी लाड यांची मनधरणी केली हाेती. त्यानंतर आता जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा लाड यांना मागे घ्यावा लागला. या घटनांमुळे तटकरेंचे राजकीय कौशल्य कसे आहे. याचा प्रत्तय पुन्हा एकदा आला आहे.

टॅग्स :RaigadरायगडNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरे