पर्यटकांना खुणावतोय सर्वे धबधबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 23:48 IST2019-07-14T23:48:05+5:302019-07-14T23:48:14+5:30

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे व प्राचीन मंदिरांना पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते;

Survey waterfall | पर्यटकांना खुणावतोय सर्वे धबधबा

पर्यटकांना खुणावतोय सर्वे धबधबा

दिघी : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे व प्राचीन मंदिरांना पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते; परंतु पावसाळा सुरू झाला की पर्यटकांचा ओघ डोंगररांगावरून कोसळणाऱ्या धबधब्याकडे वळू लागतो. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील एक धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला शांत, निवांतपणे, आनंदात जगता येईल अशी क्षणभर विश्रांती हवी असते. आठवडाभराचा कामाचा ताणतणाव दूर करण्यासाठी गावात किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवायला प्रत्येकालाच आवडते. हिरवीगार झाडे, रंगबिरंगी फुले, निरनिराळे पक्षी आणि खळाळणारा धबधबा, असे मनमोहक रूप डोळ्यांसमोर दिसताच दिवसभराचा थकवा कधी गायब होतो कळतही नाही. असेच काहीसे सर्वे येथील धबधबा पाहताना अनुभवास मिळत असल्याने तरुणांकडून सांगण्यात आले. पावसाळा सुरू असल्याने सर्वे धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
एसटीच्या ठरावीक फेºया असल्याने पर्यटकांना खासगी वाहनांनी जाण्यास सोयीचे ठरेल. कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवीन येणाºया पर्यटकांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वे गावाच्या आधी जवळपास अर्धा कि.मी. अंतरावर उजवीकडील पायवाट धबधब्याचा दिशेने जाते. जंगलक्षेत्रात धबधबा असल्याने दूरवरून जाणीव होत नाही. जवळपास अर्धा किलोमीटर गेल्यावर धबधब्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.
जंगल भ्रमंती करत अखेर कोसळणारा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. दर शनिवार, रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. धबधब्यासोबत सेल्फी घेताना पर्यटक दिसतात. वनभोजनाचा अविस्मरणीय अनुभव घेता येतो. धबधब्याच्या प्रचंड वेगामुळे कातळाची झीज झाल्याचे दिसून येते. सार्वजनिक वाहतुकीच्या गैरसोयीमुळे येथे येणाºया पर्यटकांची नाराजी दिसते. पर्यटकांची संख्या वाढली तर स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी सुविधांची गरज आहे.
>कसे जाणार?
बोर्ली पंचतनपासून आदगाव मार्गे १६ कि.मी. अंतरावर धबधब्यावर खासगी वाहनांनी जाता येऊ शकते. इथून जवळच आदगाव, वेळासचा नयनरम्य समुद्रकिनारा, नानवेलची बत्ती ही पर्यटनस्थळे आहेत.

Web Title: Survey waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.