शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 1:31 AM

अलिबागसाठी ८० कोटींची योजना : १७ हजार ग्राहकांना फायदा

आविष्कार देसाई 

अलिबाग : तालुक्यातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. खंडित वीजपुरवठ्यापासून सुटका करून घेण्यासाठी अलिबाग शहरामध्ये भूमिगत (जमिनीखाली) वीजवाहिन्या टाकण्याची योजना सुमारे तीन वर्षांपूर्वी आखण्यात आली होती. बऱ्याच कालावधीपासून कागदावरच असलेल्या योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी १० जून २०१९ पासून एका कंपनीने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. ८० कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील दीड वर्षात पूर्णत्वास येणार आहे. अलिबाग शहर, चेंढरे, वरसोलीचा काही भाग आणि विद्यानगरमधील सुमारे १७ हजार ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे.

सतत वीज गायब होण्याच्या प्रकाराने अलिबाग तालुक्यातील जनता हैराण झाली आहे. तारखेला बिल घेणारे, ग्राहकांचे वीजमीटर कापताना त्यांच्या अडचणी समजून न घेणारे वीज मंडळाचे अधिकारी, कर्मचारी लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. पावसाला सुरुवात होण्याच्या महिनाभरआधी दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यातून एकदा वीजपुरवठा खंडित केला जातो. महावितरण कामे वेळेवर करते तर मग सातत्याने वीजपुरवठा नेहमीच विविध कारणांनी खंडित कसा होतो, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. चुकीचे बिल पाठवले तरी पहिल्यांदा बिल भरायला भाग पाडले जाते, वीज गेल्यावर फोनसुद्धा बंद करून का ठेवला जातो. त्यामुळे ग्राहकांचा संताप होत असल्याचे अलिबागमधील नागरिक राहुल साष्टे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भूमिगत प्रकल्पाच्या कामाबाबत गेली तीन वर्षे नुसतेच ऐकत आहोत. त्या प्रकल्पाचे काम लवकर सुरू करून नियोजित वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही साष्टे यांनी सांगितले.जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य असलेला अलिबाग परिसरातील विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रकल्पाला २०१६ साली मंजुरी मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात जानेवारी २०१९ मध्ये हिरवा कंदील मिळाला होता. राष्ट्रीय चक्रिवादळ धोके निवारण कार्यक्रमांतर्गत अलिबाग परिसरातील विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेतले जाणार होते. जवळपास ८० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे. जागतिक बँकेचा ७५ टक्के हिस्सा आणि केंद्र सरकारचा २५ टक्के हिस्सा असणार आहे.आपत्ती धोके निवारण कार्यक्रमातून राबवण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत किनारपट्टीवरील भागात नैसर्गिक आपत्तीचे धोके जास्त प्रमाणात असतात. वादळ, वारा, अतिवृष्टी, पूर यासारख्या घटनांमुळे किनारपट्टीवरील भाग हा धोकादायक मानला जातो. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर चक्रिवादळ धोके सौम्यीकरण प्रकल्प राबविला जात आहे. किनाºयावर उद्भवणाºया धोक्यांची तीव्रता कमी करणे, नागरिकांचे जीवन सुरक्षित ठेवणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. पुढील दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे महावितरणचे विशाल सूर्यवंशी यांनी सांगितले.असा असेल प्रकल्पप्रकल्पांतर्गत शहरातील विविध भागांत जवळपास सुमारे ६४ किलोमीटर लांबीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. यात २२ केव्ही क्षमतेच्या ३६ किलोमीटर कमी दाबाच्या २८ कि.मी.च्या विद्युतवाहिन्यांचा समावेश आहे. यासाठी ८९ कोटी रु पयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. तर सबस्टेशनचे सक्षमीकरण, केबल टेस्टिंग व्हॅन यासारख्या कामांसाठी सुमारे १३ कोटी रु पयांचा खर्च केला जाणार आहे. नव्याने सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. हे कमीत कमी जागेत उभारण्यात येते त्यामुळे जागेची बचत होणार आहे.नवीन तंत्रज्ञानाचा होणार वापर६४ कि.मी.च्या वीजवाहिन्या जमिनीखालून दीड मीटर खोल अंतरावर टाकताना मोठ्या प्रमाणात खोदकाम करावे लागणार आहे. खोदकाम करताना सातत्याने वाहतुकीला अडथळा, तसेच वाहतुकीमुळे कामात व्यत्यय येणार आहे. यावर उपाय म्हणून हायलेन्स कॅमेराचा वापर करून जमिनीमध्ये ड्रील केले जाणार आहे.ग्राहकांना होणार फायदाप्रकल्पामुळे खंडित विजेची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. याशिवाय वाहिन्या, विजेचे खांब तुटून होणाºया अपघातांना चाप बसणार आहे. वीज वाहिन्यांवर पक्षी बसल्याने वीज ट्रीप होणार नाही. भूमिगत वीजवाहिन्यांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार टळणार आहेत. त्याचबरोबर वीजचोरी, वीजगळती या प्रकारांनाही आळा बसण्यास मदत मिळणार आहे. 

टॅग्स :electricityवीजalibaugअलिबाग