दासगाव अंगणवाडीत निकृष्ट तांदळाचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:26 AM2018-09-25T03:26:30+5:302018-09-25T03:26:39+5:30

महाड तालुक्यात दासगाव येथील अंगणवाडीत गेल्या महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या तांदळापैकी ५० किलोच्या एका बॅगेत अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ होता.

 Supply of Rice at Dasgaon Anganwadi | दासगाव अंगणवाडीत निकृष्ट तांदळाचा पुरवठा

दासगाव अंगणवाडीत निकृष्ट तांदळाचा पुरवठा

Next

- सिकंदर अनवारे
दासगाव - महाड तालुक्यात दासगाव येथील अंगणवाडीत गेल्या महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या तांदळापैकी ५० किलोच्या एका बॅगेत अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ होता. अंगणवाडी सेविकेने हा प्रकार वरिष्ठ कार्यालयाला कळवला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी अंगणवाडी सेविकेलाच दमात घेत तांदूळ बदलून दिला. यामुळे निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला एकात्मिक बाल विकासच पाठबळ देतेय का, असा संशय व्यक्त होत आहे.
महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालणाºया अंगणवाड्यांना सकस आहार दिला जातो. प्रत्यक्षात हा सकस आहार बालकांच्या आरोग्यास पोषक आहे का घातक असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेवर पुरवठा न होणे, निकृष्ठ दर्जाचा पुरवठा असे अनेक प्रकार वारंवार दिसून येतात. वरिष्ठ पातळीवर तक्र ारी होवून देखील कारवाई होत नसल्याने हे प्रकार सुरूच राहत आहेत.
महाड तालुक्यातील दासगाव मोहल्ला अंगणवाडीवर गेल्या महिन्यात २८ आॅगस्ट रोजी पुरवठा करण्यात आलेल्या एकूण तांदळापैकी ५० किलोच्या एका बॅगमध्ये उंदराच्या लेंड्या आणि कचरा तसेच निकृष्ट दर्जाचा तांदूळ आढळला. अंगणवाडी सेविकेने याबाबत निरीक्षक अधिकाºयांना कळवले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. माध्यमांना या प्रकाराबाबत माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाºयांचे धाबे दणाणले. एक आठवड्यानंतर महाड एकात्मिक बाल विकासच्या अधिकारी बने आणि फड यांनी अंगणवाडीवर धाव घेवून पाहणी केली. यामध्ये पन्नास किलोच्या एकाच पिशवीत खराब तांदूळ आढळून आला. याबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी अधिकारी वर्गाने तत्काळ तांदूळ बदलून दिला. खराब तांदूळ ठेकेदाराने परस्पर उचलला, मात्र पालकांनी पुन्हा तक्र ार केल्यानंतर तांदूळ महिला बाल कल्याण विभागाने मागवून घेतला.

जिल्हा एकात्मिक बाल विकास कार्यालयाला दिलेल्या लेखी तक्रारीतही, ठेकेदाराने पुरवठा केलेला तांदूळ चांगला असून फक्त एका बॅगमध्येच खराब तांदूळ आढळल्याचे सांगत ठेकेदाराची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. खराब तांदूळ बदलून दिला असला तरी ठेकेदारावर मात्र कोणतीच कारवाई वरिष्ठ पातळीवर झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने केवळ पत्रव्यवहार केला आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळणाºया ठेकेदारांवर कोणती कारवाई होतेय याबाबत पालक लक्ष ठेवून आहेत.

एकात्मिक बाल विकासची अजब कारवाई
दासगाव अंगणवाडीवर हा तांदूळ आढळून आल्यानंतर पालकांनी याबाबत तक्र ार केली, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. तांदूळ बदलून देण्याऐवजी साफ करून वापरण्याचा सल्ला अंगणवाडी सेविकेला देण्यात आला. मात्र संबंधित अंगणवाडी सेविकेने हा तांदूळ वापरला नाही.
प्रसिद्धी माध्यमाकडे तक्र ार केल्याचे समजताच एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकेलाच दमात घेतले. ज्या ठेकेदाराने हा तांदूळ पुरवठा केला होता त्या ठेकेदारावर कारवाई न करताच उलट त्याचे काम अधिकारी वर्गाने करत अंगणवाडीवर जावून तांदूळ बदलून देण्याचे काम केले.

पोषण आहाराबाबत अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दासगाव अंगणवाडीवर प्रत्यक्ष भेट देवून तांदूळ बदलून दिला आहे. शिवाय सदर ठेकेदाराकडून चांगल्या प्रकारे पुरवठा व्हावा याबाबत कळवण्यात आले आहे.
- राजेश्री बने, प्रकल्प अधिकारी, महाड

Web Title:  Supply of Rice at Dasgaon Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड