शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

समर कॅम्पमुळे मुलांच्या विकासाची उत्तम संधी

By निखिल म्हात्रे | Published: May 08, 2024 5:56 PM

ग्रामीण भागातील मुलांनाही समर कॅम्प सारखा किंबहुना त्याहून अधिक आनंद सुट्टीत घेता येणार आहे. त्यामुळे यंदाची सुट्टी मुलांसाठी धम्माल मस्ती करणारी ठरणार आहे.

अलिबाग - परीक्षा संपल्या की, ठिकठिकाणी ‘समर कॅम्प’च्या जाहिरातींचे बोर्ड आपल्याला सर्रास दिसून येतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांनी नेमके काय करावे आणि काय करू नये, यासाठी पालक जास्तीत जास्त काळजी करताना दिसतात. त्यांच्यातील हाच पॉइंट हेरून खासगी संस्थांनी समर कॅम्पचे फॅड आणले आहे. अलीकडे हाच ट्रेंड शहरांमध्ये चांगलाच स्थिरावत आहे; परंतु ‘गड्या आपुला गावच बरा’ असे म्हणणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी समर कॅम्पच्याच धर्तीवर उन्हाळी शिबिर सध्या सुरु झाली आहे.

ग्रामीण भागातील मुलांनाही समर कॅम्प सारखा किंबहुना त्याहून अधिक आनंद सुट्टीत घेता येणार आहे. त्यामुळे यंदाची सुट्टी मुलांसाठी धम्माल मस्ती करणारी ठरणार आहे. शहरांमध्ये विविध संस्था समर कॅम्पचे आयोजन करत असतात. त्यामध्ये मुलांना स्वीमिंग, हॉर्स रायडिंग, डान्सिंग, सिंगिंग, अ‍ॅक्टिंग यासह अन्य अ‍ॅक्टिव्हिटी शिकवतात. त्यासाठी मुलांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात फीही घेतली जाते. शहरामध्ये राहणाऱ्यांना अशा समर कॅम्पची फी परवडणारी असते. त्यामुळेच तर आपल्याला अशा समर कॅम्पमध्ये मुला-मुलींची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आठ दिवस ते १५ दिवसांसाठी असणाऱ्या समर कॅम्पमध्ये विविध त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते, असा दावा त्या संबंधित संस्थेमार्फत केला जातो. 

समर कॅम्पमध्ये चित्रकला, रांगोळी, मनोरंजनात्मक पारंपरिक खेळ (विटी दांडू, गोट्या, सूरपारंब्या, लगोरी) नाट्यीकरण, गोष्टी, गाणी, कथा, कविता, बडबड गीते गायन, मातीकाम यासह जमेल तसे इंग्रजी बोलणे, पारंपरिक वेशभूषा करणे, मैदानी खेळ, व्यक्तीमत्तव विकास घडविणारे बाबींचे ज्ञान, सामान्य ज्ञान, मुखवटे अशा साऱ्या गोष्टी शिकविल्या जातात.

समर कॅम्पच्या  माध्यमातून आम्ही मुलांचे कला गुण पाहून त्या प्रमाणे त्यांना  सुटटीचा आंनद कसा घेता येईल. या कडे विशेष लक्ष देत आहोत.- पुर्णता पाटील, शिक्षिका.

उन्हाचा पारा सकाळ पासूच चढत असल्याने मैदानी खेळ खेळता येत नाहीत, मात्र  समर कॅम्प च्या  माध्यमातून  आम्ही अंतर्गत खेळ आम्ही खेळून  सुट्टीचा आंनद घेत आहोत.- प्रसाद म्हात्रे, विद्यार्थी .

मैदानी खेळ उन्हामुळे खेळता येत नसल्याने मुले घरात त्रस्त होत होती, परंतु समर कॅम्प मुळे अगदी आंनदाने त्या ठिकाणी सर्व मुलांन सोबत वेळ घालवत आहेत. - ॲड. गीता म्हात्रे, पालक.

टॅग्स :alibaugअलिबाग