महावितरणच्या कनिष्ठ अभियंता तरुणीची आत्महत्या; मुळची औरंगाबादची
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 07:32 IST2023-05-21T07:31:42+5:302023-05-21T07:32:11+5:30
शुक्रवार १९ मे रोजी अभिलाशा हिने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता तरुणीची आत्महत्या; मुळची औरंगाबादची
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : तालुक्यातील गोरेगाव येथे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिलाशा अभिमन्यू शेळके (वय २८, रा. मूळ औरंगाबाद) असे या तरुणीचे नाव असून ती महावितरण कार्यालयात कार्यरत होती.
मृत अभिलाषा शेळके गोरेगाव येथे कनिष्ठ अभियंता या पदावर ही तरुणी कार्यरत होती. महावितरणच्या गोरेगाव येथील वसाहतीत मृत तरुणी एकटीच राहत होती. शुक्रवार १९ मे रोजी अभिलाशा हिने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. गोरेगाव पोलिस ठाणे येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उभारे अधिक तपास करीत आहेत.