शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतमालाला येणार सुगीचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:48 IST

ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख मिळणार

- आविष्कार देसाई अलिबाग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार आहे. ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी मालामाल होऊन त्यांना सुगीचे दिवस येण्यास मदत मिळणार आहे.पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिली. शेतमाल विक्री केंद्र उभारण्यासाठी लागणाºया विविध सोयी-सुविधा लवकरच निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात भाताबरोबरच आंबा, काजू, चिकू, तोंडली, कांदा, अशा अनेक पिकांबरोबरच फळे आणि भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते; परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकºयांनी घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. त्याचा फायदा व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने घेतो. जिल्ह्यातील शेतकºयांच्या सर्वच पिकाला चांगला दर मिळावा, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी शेतमालासाठी विक्र ी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केल्याचे पाटील यांनी सांगितले.शेतमालाचे ऑनलाइन मार्के टिंग करून थेट शेतकºयांना विक्री केलेल्या मालाची रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यातून करण्यात येणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम पेणमध्ये उभारण्यात येणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकºयांना सर्व पिकाची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे. शेतकºयांनाही आधुनिक शेती पद्धतीचे महत्त्व, मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या उपक्रमातून कृषी पर्यटनवाढीला चालना मिळण्यास मदत मिळेल.ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतकरी होणार मालामालऑनलाइन विक्री व्यवहारामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची कवाडे खुली होण्यास मदतच होणार आहे.अलिबाग तालुक्यातील हापूस आंबा जागतिक स्तरावर पोहोचला, त्याचप्रमाणे येथील विविध पिकांनाही त्याच दिशेने नेता येणे शक्य होणार आहे.आॅनलाइन मार्केटिंगमुळे अडते, दलाल हे बाजूला पडून थेट उत्पादक शेतकरी ते ग्राहक असा व्यवहार होणार असल्याचा फायदा येथील शेतकºयांना होऊन शेतकरी चांगलाच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते.पर्यटकांना शेतमालाशी जोडणारजिल्ह्यातील लहान शेतकºयांपासून मोठ्या शेतकºयांचा आर्थिक विकास या केंद्राद्वारे होणार आहे. आॅनलाइन नोंदणी करून स्थानिक शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी उत्पादित केलेल्या सर्व मालाची चव, वैशिष्ट्ये याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष भर देणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी सांगितले.शेतमाल विक्री केंद्र ठरणार मैलाचा दगडरायगड जिल्हा देशाचे आर्थिक केंद्र असणाºया मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कित्येक वर्षे रायगड जिल्ह्यात विविध शेतमालाचे प्रचंड उत्पादन घेतले गेले. मात्र, शेतकºयांना त्याचा योग्य दर कधीच मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनसुद्धा शेतमालाच्या बाबतीमध्ये रायगड जिल्हा मागासलेलाच राहिला, असे म्हणणे योग्य ठरेल. पेण येथे विक्री केंद्र उभारण्याचा रायगड जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनagricultureशेती