शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

सुधागडात कवेळे धरणाला गळती, पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:33 AM

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिका अनेक ठिकाणी कचरा व मुळ्या जाऊन चोकअप झाल्या आहेत.

- विनोद भोईरपाली : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिका अनेक ठिकाणी कचरा व मुळ्या जाऊन चोकअप झाल्या आहेत. त्यामुळे धरण व बंदिस्त नलिकांची ताबडतोब दुरुस्तीची आवश्यकता आहे. या धरणाच्या पाण्यावर असलेले सिंचनक्षेत्रही झपाट्याने घटले आहे. त्यामुळे धरणाच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.लघु पाटबंधारे विभागामार्फत १९७३ मध्ये कवेळे धरणाचे बांधकाम करण्यात आले. यावेळी १६.६८ लाखांचा खर्च आला होता. धरणाचे सिंचनक्षेत्र ८१२ हेक्टर आहे. सिंचनाच्या उद्देशाने धरणाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील इतर चार धरणांपेक्षा सर्वाधिक सिंचनक्षेत्र या धरणाचे आहे. मात्र यातील १० टक्क्यांपेक्षा कमी पाण्याचा सिंचनक्षेत्राचा वापर केला जात आहे.गेली कित्येक वर्षे धरणाची दुरु स्ती करण्यात आलेली नाही. कवेळे धरणाला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. यावर लघुपाटबंधारे विभागाकडून जलद उपाययोजना करण्याची गरज आहे.अतितातडीचे म्हणून कवेळे धरणाच्या दुरु स्तीचे काम केले जाणार आहे. सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी दरवर्षी स्थानिकांची बैठक घेतली जाते. बंदिस्त नलिकांची किरकोळ दुरु स्ती देखील केली जाते. मात्र जोपर्यंत सिंचनाखालील क्षेत्र वाढत नाही तोपर्यंत यांच्या दुरु स्तीसाठी शासनाकडून खर्च किंवा अनुदान दिले जात नाही.- आर. के. सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाडआधी खोदलेले कालवे बरे होते. त्याच्यावर भातशेती केली जायची. आता वारंवार जलवाहिनी चोक होत असल्याने शेवटपर्यंत पाणी पोहोचतच नाही. शिवाय गळतीचाही फटका शेतीला बसतो. त्यामुळे अनेकांनी शेतात लागवड करणेच बंद केले आहे. काही ठिकाणी कडधान्याचे पीक घेतले जात आहे.- अंकिता विशाल चिले, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत, वाघोशी

टॅग्स :Raigadरायगड