शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

सुभाष पुजारी ठरले मास्टर भारत श्री २०२१; हा पुरस्कार जिंकणारे देशातील पहिलेच पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 23:27 IST

कोल्हापूर येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापूरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले होते अशावेळी त्यांनी कोल्हापूर येथील ६०० कुटुंबीयांना किमान ८ दिवस पुरेल इतका रेशन पुरवठा केला होता

वैभव गायकरपनवेल : इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन यांचेवतीने २० व २१ मार्चदरम्यान  लुधियाना पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या मेन्स ज्युनिअर, मास्टर, दिव्यांग, वुमेन ज्युनिअर, ज्युनिअर नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप  या स्पर्धेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ‘भारत श्री २०२१’ स्पर्धेचे मानकरी ठरले आहेत. हा किताब फडकविणार पुजारी हे देशातील पहिलेच पोलीस अधिकारी आहेत. 

‘मास्टर भारत श्री’ २०२१ खेळताना ८० किलो वजनीगटात  सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्र पोलीस खात्याची मान  वाढविणारी आहे. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान मालदीव येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुजारी भारतचे नेतृत्व करणार आहेत. राष्ट्रीय मास्टर एशिया श्री २०२१ या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांची निवड भरतीय संघातून झाली आहे. सुभाष पुजारी हे  सहा. पोलीस निरीक्षक म्हणून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यांनी महामार्ग पोलीस विभागात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी वेगवेगळी उपक्रम राबवून महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावण्याचे काम केले आहे.

कोल्हापूर येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापूरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले होते अशावेळी त्यांनी कोल्हापूर येथील ६०० कुटुंबीयांना किमान ८ दिवस पुरेल इतका रेशन पुरवठा केला होता. त्याचबरोबर कोरोनाकाळात महामार्ग पोलीस व त्यांचे कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले. 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवPoliceपोलिस