विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार

By Admin | Updated: August 5, 2015 00:22 IST2015-08-05T00:22:30+5:302015-08-05T00:22:30+5:30

राज्य परिवहन मंडळाच्या रायगड (पेण) विभागीय कार्यालयाच्या गेल्या सुमारे दोन वर्षांच्या नाकर्तेपणामुळे पेण तालुक्यातील वरसई या दुर्गम गावातील पेण

Students' legs will stop | विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार

विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार

जयंत धुळप, अलिबाग
राज्य परिवहन मंडळाच्या रायगड (पेण) विभागीय कार्यालयाच्या गेल्या सुमारे दोन वर्षांच्या नाकर्तेपणामुळे पेण तालुक्यातील वरसई या दुर्गम गावातील पेण एज्युकेशन सोसायटीच्या पु. न. गोडसे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना दररोज ११ किमीची पायपीट करावी लागत होती.
परिसरातील आष्टे, मोहिली, खालसा, घोटे, उत्तेश्वरवाडी आदी गावांतील २०६ मुले व १९९ मुली अशा एकूण ४०५ विद्यार्थ्यांना दररोज जाता-येता ११ किमी चालून शाळेत यावे लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. अखेर सोमवारी ‘पेण-घोटे ही एसटी सुरु झाली.
वरसई, मोहिली, खालसा, घोटे, उत्तेश्वर मार्गावर एसटी बस सुरु करण्याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या मुंबईतील कार्यालयाशी आवश्यक तो प्रत्यक्ष संपर्क साधून कार्यवाही पूर्ण करण्याचे काम रायगड विभागीय कार्यालयाचे वाहतूक निरीक्षक संजय हर्डीकर यांनी पूर्ण केली.
सोमवारी ही एसटी बस सुरु झाली, परंतु ती तिच्या नियोजित वेळी आली. मात्र ती गेली की काही गावांतील मुलांना चालतच जावे लागले. शाळेची नियोजित वेळ लक्षात घेऊन त्याच वेळेत पेण-घोटे-पेण एसटी बस चालावी तसेच पेण-जावळी-पेण ही चालू असलेली एसटी बस बंद करू नये.
मंगळवारी पेण-जावळी ही नियमित एसटी बस आलीच नाही, त्यामुळे जावळी गावातील मुलांना चालत जावे लागले, अशी माहिती पु. न. गोडसे विद्यामंदिराच्या वरिष्ठ शिक्षिका अंजली जोशी यांनी
दिली.मुलांची पायपीट थांबली आणि बस वेळेत आल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली आहे. नव्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची पायपीट वाचली आहे

Web Title: Students' legs will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.