एपीएमसीमध्ये २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:38 PM2020-05-30T23:38:14+5:302020-05-30T23:38:24+5:30

संडे अँकर । कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना : औषध फवारणी केल्यानंतरच मार्केटमध्ये प्रवेश; प्रतिदिन साडेनऊशे वाहनांनाच परवानगी

Sterilization of 2 lakh 85 thousand vehicles in APMC | एपीएमसीमध्ये २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण

एपीएमसीमध्ये २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण केले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक उपाययोजना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राबविण्यात येत आहेत. मार्केट आवारातील प्रादुर्भाव कमी करणे व मुंबईकरांना अखंडपणे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
याचाच भाग म्हणून मार्केटमध्ये येणाºया प्रत्येक वाहनावर औषध फवारणी केली जात आहे. शेतमाल घेऊन येणारी वाहने, खरेदीदार व व्यापाऱ्यांच्या वाहनांवरही औषधांची फवारणी केली जात आहे. वाहनांमुळे विषाणूंचा प्रचार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. गाडी चालविणाºयांनाही मास्क घालण्याच्या व सॅनेटायझर वापरण्याच्या सूचना केल्या जात आहेत. २० मार्चपासून आतापर्यंत तब्बल २ लाख ८५ हजार वाहनांवर औषध फवारणी केली आहे. पाचही मार्केटमध्ये आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे.
बाजार समिती प्रशासनाने मार्केटमध्ये येणाºया वाहनांच्या संख्येवरही निर्बंध घातले आहेत. पाचही मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येणाºया साडेनऊशे वाहनांनाच प्रतिदिन प्रवेश दिला जात आहे. खरेदीदारांच्या वाहनांसाठीही परवाना घेणे बंधनकारक आहे. मार्केटमधील व्यापारी व इतर काम करणाºया व्यक्तींनाच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. विनाकारण कोणालाही मार्केटमध्ये फिरू दिले जात नाही.

Web Title: Sterilization of 2 lakh 85 thousand vehicles in APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.