शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल - नाना पटोले

By वैभव गायकर | Updated: January 6, 2023 18:07 IST

२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

पनवेल:२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल. कारण काँग्रेस सत्तेत आली पाहिजे ही जनभावना आहे. ते करण्याचे काम मी करतोय. मुख्यमंत्री कोणाला करायचे हे आमचे हायकमांड ठरवतील. काँग्रेसला सत्तेत आणणे हे माझे दायित्व आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून देशाचे संविधान संपवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम सुरू आहे. कामगारांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. यासाठी देशाला कॉंग्रेसची गरज आहे. तसेच कामगारांना न्याय देण्यासाठी इंटकची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते आज पनवेलमध्ये इंटकचे अधिवेशन व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यादरम्यान बोलत होते.

मेळाव्यात कामगारांचे विविध प्रश्न आणि ठराव मांडण्यात आले. यावेळी नाना पटोले यांनी सरकार कशा पद्धतीने कामगारांवर अन्याय करीत आहे हे सांगताना सरकारवर सडकून टीका केली. भाजप ईडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही. मुंबई महापालिकेसह इतरही महापालिका निवडणुकांच्या घोषणा होऊनही अजून निवडणुका घेतल्या जात नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, कारण निवडणुकांना भाजप घाबरलेली आहे. लोकांच्या मनात भाजप विरोधात राग आहे. महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ असे अनेक प्रश्न भेडसावतायत.याप्रसंगी इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, राष्ट्रीय इंटक उपाध्यक्ष आर पी भटनागर, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, सुनील शिंदे, विनोद पटोले, भाग्यश्री भुर्के, दिवाकर दळवी, डॉ.भक्तीकुमार दवे, नंदराज मुंगाजी, श्रुती म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, अरविंद सावळेकर ,सुदाम पाटील यांच्यासह इंटकचे व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ताहीर पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अमित लोखंडे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला सिंह, अस्मिता पाटील, हरपिंडर वीर, सुदेशना नारायते, विनीत कांडपिळे, जयश्री खटकाले, शिला घोरपडे, सुनीता माळी यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात नाना पटोले यांच्या उपस्थितीत घरवापसी केली.

 

टॅग्स :panvelपनवेलcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेChief Ministerमुख्यमंत्री