शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नवी मुंबईत जमीन संपल्याने क्रीडा संकुल रायगडात, ८४ कोटींच्या विभागीय संकुलास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 02:39 IST

रायगड जिल्ह्यामध्ये काेकण विभागाचे क्रीडा संंकुल उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माणगाव तालुक्यातील नाणारे येथे सुमारे  ८४ कोटी रुपये खर्च करून सदरचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.

रायगड : जिल्ह्यामध्ये काेकण विभागाचे क्रीडा संंकुल उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माणगाव तालुक्यातील नाणारे येथे सुमारे ८४ कोटी रुपये खर्च करून सदरचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईमध्ये  क्रीडा संकुलासाठी आवश्यक असणारी सरकारी जमीन उपलब्ध न झाल्याने विभागीय क्रीडा संकुल रायगड जिल्ह्याच्या पदरात पडले  आहे. माणगाव-नाणोरे येथे उभारण्यात येणारे विभागीय क्रीडा संकुल काेकणातील खेळाडूंसाठी माइल स्टाेन ठरणार असल्याचा विश्वास रायगडच्या पालकमंत्री तथा क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. कोकण विभागाचे विभागीय क्रीडा संकुल नवी मुंबई येथे उभारण्यात येणार हाेते. परंतु नवी मुंबई परिसरात या संकुलासाठी आवश्यक सरकारी जमीन उपलब्ध झाली नाही. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुल हे काेकणाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे असल्याचे मत तटकरे यांनी मांडले हाेते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नाणाेरे येथील स.नं.१३०/० मधील १०.०० हेक्टर (२४ एकर) सरकारी जमीन विभागीय क्रीडा संकुल, कार्यकारी समिती, मुंबई विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. या संकुलासाठी त्र्याऐंशी कोटी चव्वेचाळीस लाख सोळा हजार रुपयांच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यास सरकारने मान्यता दिली आहे. विभागीय क्रीडा संकुलात काय? या क्रीडा संकुलामध्ये ४०० मीटर सिंथेटिक धावनपथ, फुटबॉल मैदान, ॲथलेटिक्स पॅव्हेलियन बिल्डिंग, हॉकी मैदान चेंजिग रूमसह, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, टेनिस कोर्ट, चेंजिंग रूम, आऊटडोअर गेम, अंतर्गत रस्ते, इनडोअर हॉल, जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव, संरक्षण भिंत, मुले-मुली वसतिगृहे, रेनवॉटर हार्वेस्टिंग त्याचप्रमाणे बोअरवेल, फिल्टरेशन प्लँट, जलतरण व डायव्हिंग तलाव सुविधांचा समावेश आहे. 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई