गणेशोत्सवपूर्व रस्ताकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:32 AM2017-08-18T02:32:38+5:302017-08-18T14:48:07+5:30

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाºया गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना वेग आला

Speed ​​of Ganesh Festival | गणेशोत्सवपूर्व रस्ताकामांना वेग

गणेशोत्सवपूर्व रस्ताकामांना वेग

Next

नागोठणे : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाºया गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी सकाळी राज्याचे महसूल, मदत-पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून त्यांनी सायन ते पनवेल महामार्ग, तेथून पुढे पळस्पे फाटा येथून वडखळ मार्गे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. या वेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंग, सचिव सी. पी. जोशी, सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम कोकण विभागाचे मुख्य अभियंता केडगे, विशेष प्रकल्प अधीक्षक आर. टी. पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजीव सिंग व प्रशांत फेगडे आदी वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक बांधकाम व महसूल प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
या वेळी चंद्रकांत पाटील यांनी पळस्पे फाटा मार्गे खारपाडा, पेण, वडखळ, नागोठणे, वाकण फाटा मार्गे पाली ते खोपोली मार्गाची पाहणी केली. पनवेल व पाली येथील विश्रामगृहांवर थांबून त्यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या व स्थानिक पदाधिकाºयांचे म्हणणेही ऐकून घेतले. रस्ते डागडुजीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले.
अधिकाºयांना सूचना
या वेळी मंत्री पाटील यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते डागडुजीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. तसेच २२ तारखेच्या आत ही कामे पूर्ण होतील, या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही संबंधित अधिकाºयांना दिल्या.

Web Title: Speed ​​of Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.