शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

सोलनपाडा पाझर तलावाला लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 1:24 AM

आमदारांकडून पाहणी : ग्रामस्थांचे स्थलांतर; भीतीचे वातावरण

ठळक मुद्देधरण फुटून कोणताही अपघात होऊ नये यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी सोलनपाडा धरणावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली

कर्जत : तालुक्यातील जामरुंग जवळ असलेल्या सोलनपाडा पाझर तलावातून पाणी गळती सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी २६ जुलैपासून स्थलांतरण केले आहे. धरणाची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी सोलनपाडा येथे जाऊन धरणाची पाहणी केली. यावेळी लघुपाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी धरणाची पाहणी करण्यासाठी पोहचला नाही.

कर्जत तालुक्यात १९८० साली बांधलेल्या सोलनपाडा येथील पाझर तलावाची दुरुस्ती रायगड जिल्हा परिषदेने तब्बल ६ कोटी रुपये खर्चून पाच वषार्पूर्वी केली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या परिसरात २०० मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे खोदकाम आणि सुरुंगस्फोट करण्यास बंदी असताना देखील १०० मीटर अंतरावर खासगी जमीन घेणाऱ्यांनी खोदकाम आणि सुरुंग स्फोट केले आहेत. त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात धरणाच्या मुख्य बांधामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊ लागली होती. २६ जुलैच्या रात्री धरण भरून वाहू लागल्यानंतर मात्र धरणाच्या बांधामधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पाणी गळती बघून ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यांनी रात्रीच गाव सोडून सुरक्षित ठिकाण म्हणून जामरुंग गाव गाठले. आतापर्यंत तेथे सोलनपाडा ग्रामस्थांनी दोन रात्र मुक्काम केला आहे. मात्र ग्रामस्थांची भीती काही कमी झाली नाही अशी माहिती स्थानिक रहिवासी मंगेश सावंत यांनी दिली आहे.

धरण फुटून कोणताही अपघात होऊ नये यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी सोलनपाडा धरणावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती नारायण डामसे, स्थानिक जेष्ठ कार्यकर्ते अशोक सावंत,भास्कर देसले, माजी सरपंच हरेश घुडे,पंढरीनाथ पिंपरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुक्याचे तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार संजय भालेराव उपस्थित होते. आमदार लाड यांना धरणाची स्थिती आणि धोका यांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. एवढे धोकादायक धरण क्षेत्र झालेले असताना लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी अजूनपर्यंत धरण परिसरात फिरकले नाहीत.डोंगरपाडा धरण वाहून गेल्यानंतर त्या भागातील जनतेने पाणीटंचाई काय असते हे अनुभवले आहे. आपण सोलनपाडा पाझर तलावाची प्राधान्य देऊन दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे माहिती मिळताच पाझर तलावाची स्थिती अभियंत्यांकडून जाणून घेतली. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणार आहे.- सुरेश लाड,आमदार कर्जत

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडWaterपाणीRainपाऊस