शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा, वीकेंड लॉकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:29 IST

बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून फेरीवाले, भाजीवाल्यांना पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हलविण्यात आले.

 कर्जत : सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा सुरू असून शनिवार - रविवार विकेंड लाॅकडाऊन असतो. त्यामुळे शुक्रवारी आणि सोमवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. आज सोमवारी या गर्दीने कर्जत बाजारपेठेत परिसीमा गाठली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी बहुतांश जण मास्कचा वापर करताना दिसले. बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून फेरीवाले, भाजीवाल्यांना पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हलविण्यात आले. पहिले काही दिवस पोलीस मैदानात सर्व जणांनी आपली दुकाने थाटली मात्र आता हळूहळू पुन्हा बाजारपेठेत फेरीवाले व भाजी फळ विक्रेते बसू लागल्याने नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. सकाळी सात ते सकाळी ११ ही वेळ ग्राहक व व्यापारी या दोघांसाठी गैरसोयीची आहे. कारण सकाळी सात वाजता खरेदीसाठी जास्त कुणी येत नाही आणि या दिलेल्या चार तासांपैकी दीड - दोन तास दुकान उघडून लावणे व नंतर बंद करताना आवरणे यासाठी जातात. ग्राहक खरेदीसाठी नऊसव्वा नऊपासून येतात कारण नगरपरिषदेची पाणीपुरवठा करण्याची वेळ सुद्धा त्या दरम्यान असते. त्यामुळे आधीचे दोन तास वाया जातात व उरलेल्या दोन तासात ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत होते. या चार तासात भाजी व फळ विक्रेत्यांची पूर्ण भाजी किंवा फळे विकली जात नाहीत. पोलीस ठाण्यासमोरच मैदानावर ते विक्री करीत असल्याने अकराच्या ठोक्याला त्यांना दुकाने बंद करावी लागतात त्यामुळे त्यांची निम्म्याहून अधिक भाजी व फळे शिल्लक राहतात व दररोज नुकसान होते. काही ग्राहक चारचाकी गाड्या दुकानासमोर बिनधास्तपणे लावून खरेदी करीत असल्याने नाहक वाहतूक कोंडी होऊन वेळ वाया जातो. दुचाकी तर मोठ्या संख्येने बाजारपेठेत आणण्यात येतात. त्यामुळेही बाजारपेठेत गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. त्यातच कर्जत शहरातील काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे थोडीशी पंचाईत होते. त्यामुळे सकाळची सात ते अकरा ही वेळ बदलून दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवल्यास गर्दीला नक्कीच आळा बसेल.

बोर्ली-मांडला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राज्यात व जिल्ह्यात करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर आज सोमवारी सकाळी बोर्ली-मांडला, नांदगाव, मजगांव परिसरात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.

जिल्ह्यातकोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाच्यावतीने निर्बंध लागू जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच १५ मेपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आला असून वीकेंड लाॅकडाऊनआधी व नंतर बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची लगबग दिसून येते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस