आतापर्यंत जनआशीर्वाद यात्रेचा ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:45 PM2019-09-16T23:45:51+5:302019-09-16T23:46:42+5:30

जनआशीर्वाद यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत अवतीर्ण झाली आहे.

So far, Jan Aashirwad Yatra has traveled more than 5 thousand 5 km | आतापर्यंत जनआशीर्वाद यात्रेचा ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास

आतापर्यंत जनआशीर्वाद यात्रेचा ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास

Next

पेण : जनआशीर्वाद यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत अवतीर्ण झाली आहे. रायगडावर शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहिलेला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकत असल्याने रायगड शिवसेनेसाठी अवघड नाही, तुम्ही निश्चिंत रहा, पुढचं काय होणार आहे ते बघून घेवू. जनआशीर्वाद यात्रेत मी महाराष्टÑातील तमाम जनतेशी संवाद साधीत असून आतापर्यंत ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास करून ९० विधानसभा मतदारसंघात जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेतलेले आहेत. सगळ्याच ठिकाणी मला शिवसेनेच्या भगव्याचे दर्शन घडले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगार, प्रदूषणमुक्त महाराष्टÑ, पर्यावरण प्रफुल्लित महाराष्टÑ घडविण्यासाठी मला सर्वांची साथ हवी आहे, असे प्रतिपादन शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पेण येथील जनसंपर्क यात्रेप्रसंगी जनतेशी संवाद साधताना केले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनसंपर्क यात्रा पेणमध्ये दुपारी २ वाजता दाखल झाली. पेणच्या आगरी समाज विकास मंच या सभागृहात आदित्य ठाकरे यांनी पेणच्या जनतेशी सुसंवाद साधला. याप्रसंगी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कोणाला निवडून आणायचे कोणाचे सरकार येणार हा विषय बाजूला ठेवून शिवसेना ८० टक्के समाजकारण करते, वर्षातील ३६५ दिवस माझा शिवसैनिक हे समाजसेवेचे व्रत नित्यनेमाने पाळतो. राजकारणाच्यावेळी राजकारण हे तेवढ्यापुरतेच सीमित राहते. शिवसेनेमध्ये कोणी आमदार होतो, कोणी खासदार, कोणी मंत्री होतो, परंतु या सर्वांपेक्षा माझा शिवसैनिक मोठा आहे. शिवसैनिक आणि शिवबंधनाचा धागा हा शिवसेनेचे जीव की प्राण आहे. त्या शिवसैनिकांना व जनतेला भेटण्यासाठीच माझी ही जनआशीर्वाद यात्रा असल्याने त्यांनी सांगितले. जनआशीर्वाद यात्रा ही मी तीर्थयात्रा समजतो यामुळेच मला या यात्रेत महाराष्टÑातील आबालवृद्धांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. तुम्ही माझ्याकडे जी निवेदने दिलीत त्या समस्या दूर करण्यासाठीच व नवा महाराष्टÑ घडविण्याचा संकल्प या जनआशीर्वाद यात्रेचा मूळ हेतू आहे. याच चांगल्या कामासाठी मला सर्वांचीच सोबत हवी आहे. चला पुढे जाऊ या आणि नवा महाराष्टÑ घडवूया असे ते शेवटी सांगितले.
याप्रसंगी उपस्थितांमध्ये शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी याशिवाय आ. सचिन अहिर, बबन पाटील, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांची उपस्थिती होती.
>रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा
रायगड जिल्ह्यातील माणगाव, कर्जत, मोहपाडा, अलिबाग, पनवेल येथे जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली होती, यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी भावनिक आवाहन त्यांनी के ले.

Web Title: So far, Jan Aashirwad Yatra has traveled more than 5 thousand 5 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.