हुमगाव ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’
By Admin | Updated: May 11, 2017 02:06 IST2017-05-11T02:06:30+5:302017-05-11T02:06:30+5:30
कर्जत तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायतीचा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यांना पालक मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र

हुमगाव ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायतीचा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यांना पालक मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले असून दहा लाख रु पयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. हुमगाव ग्रामपंचायतीला हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाल्याने कौतुक केले जात आहे.
राज्यातील गावांचा विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्यात सन २०१०-११ पासून पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत उद्दिष्ट साध्य केलेल्या ग्रामपंचायतींना निधीच्या स्वरूपात पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार कर्जत तालुक्यातून हुमगाव ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. हुमगाव ग्रामपंचायतीने पर्यावरणाचा समतोल राखणे, व त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे, चांगल्या प्रकारे विकासकामे यात गुण प्राप्त केल्याने या ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली होती. हुमगाव ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला, प्रमाणपत्र देऊन १0 लाख रु पयांचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचे ग्रामसेवक अनुजा एनकर यांनी सांगितले.