महाडमध्ये बंद कारमध्ये गुदमरून भावंडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:58 IST2020-10-01T23:57:45+5:302020-10-01T23:58:03+5:30
सोहेल जकात खान (५) आणि अब्बास जकात खान (३) अशी मृत्यू झालेल्या या चिमुकल्यांची नावे आहेत. नांगलवाडी येथे एक भंगाराचे गोदाम असून येथे एक होंडा सिटी (एम.एच. 0४ - बी.के. ७५३७) ही बंद कार उभी होती

महाडमध्ये बंद कारमध्ये गुदमरून भावंडांचा मृत्यू
महाड : मुंबई-गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार गोदामाशेजारी एका बंद होंडा सिटी कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्या सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.
सोहेल जकात खान (५) आणि अब्बास जकात खान (३) अशी मृत्यू झालेल्या या चिमुकल्यांची नावे आहेत. नांगलवाडी येथे एक भंगाराचे गोदाम असून येथे एक होंडा सिटी (एम.एच. 0४ - बी.के. ७५३७) ही बंद कार उभी होती. या कारमध्ये सात वाजण्याच्या सुमारास खेळत असताना अब्बास व सोहेल यांच्या हातून अचानक गाडीचा दरवाजा आतून लॉक झाला. घाबरलेल्या या दोघांनाही बंद गाडीचे दरवाजे आणि काचा उघडणे शक्य झाले नाही. यामुळे गाडीमध्ये गुदमरून त्या दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, या दोन्ही मुलांना बाहेर काढले. परंतु ते दोघे मरण पावले होते. महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात या दोन मुलांच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी करीत आहेत. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.