- संतोष सापतेश्रीवर्धन: समुद्र किनारी सायं ६ः३0च्या सुमारास पेट्रोलिंगसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुणे व औरंगाबाद येथील प्रिवेडिंग शूट करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची आरडाओरड सुरू होती. म्हणून याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकांना त्यांनी मारहाण केले. या मारहाणीत पोलीस निरीक्षक खेडेकर यांना दुखापत झाली असून, त्यांचा डावा हात उतरला आहे. यातील तीन महिला व तीन पुरुष आरोपी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अटक आहेत. तर तीन आरोपी फरार आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात याची रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे.
श्रीवर्धन पोलीस निरीक्षकांना पर्यटकांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 23:26 IST