शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

'शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:34 IST

शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे.

माणगाव : शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे. रायगड लोकसभेमध्ये वादळ निर्माण झाले असून, या वादळामध्ये धनुष्यबाणाचे किती तुकडे होतील व कमळाबाईच्या किती पाकळ्या होतील, हे चित्र येथील जनतेला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी के ले.माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे रायगड लोकसभा निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,काँग्रेस, शेकाप, पीआरपी (कवाडे गट), आरपीआय (गवई गट), मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या सभेसाठी मुंडे गुरूवारी आले होते. धनंजय मुंडे म्हणाले की, २०१४ मध्ये मोदीलाट होती; परंतु आपल्या गाफीलपणामुळे सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता २०१९ मध्ये संधी मिळाली असून, तटकरेंना सार्वभौम सभागृहामध्ये पाठवण्याची हीच वेळ आहे. मी राज्यामध्ये अनेक सभा घेतल्या; परंतु मोदीलाट कुठे दिसली नाही. मागील निवडणुकीमध्ये जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत होते; परंतु आता अच्छे दिनाची चेष्टा गावांमध्ये, शहरांमध्ये होऊ लागली आहे.नितीन गडकरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, अच्छे दिन बिच्छे दिन कुछ नही होता, उसको महसूस करना होता है, अशा प्रकारे हे जनतेची फसवणूक करीत आहेत.उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते म्हणाले की, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, मुख्यमंत्री झाला नाहीत तरी तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली याची इडीमार्फत चौकशी करण्यात येईल. सुनील तटकरेंना बदनाम करण्याचा कट यांनी केला आहे. अनंत गीते हे केंद्रात विविध पदांवर असताना काम करण्याची संधी मिळाली होती; परंतु त्यांच्याकडून विकासाचे प्रश्न सुटले नाहीत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून, यांचा संबंध थेट मातोश्रीही आहे. १५ वर्षांच्या नवसाने सरकार आले आणि मंत्र्यांच्या घोटाळ्याने सरकार गेले, अशी वेळ यांच्यावर आली आहे.देशाच्या लोकशाहीसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. या देशामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. कोकणची जनता सुज्ञ असून, तटकरे हे केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतीलच असा विश्वास व्यक्त केला.>भाजप व शिवसेनेवर टीकापाच वर्षांत मोदी सरकारने जनतेची लूट केली. नीरव मोदी २४ हजार कोटी, ललित मोदी आठ हजार कोटी, चोकसी, विजय मल्ल्या हे पळून गेले, तेव्हा देशाचे चौकीदार हेच होते. राफेल घोटाळा, व्यापमं घोटाळा, महाराष्ट्रातील १६ मंत्र्यांनी ९० हजार कोटी खाल्ले, याचे उत्तर देशाला द्यावेच लागणार आहे. पहारेकरी व चौकीदार हे दोघेही चोर असल्याटी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड