पत्रकार मारहाण प्रकरणात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील दोषी; ५ हजार नुकसान भरपाई देण्याचेही कोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:09 IST2025-10-18T11:09:01+5:302025-10-18T11:09:17+5:30
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांनी दोषी ठरवले. एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पत्रकार मारहाण प्रकरणात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील दोषी; ५ हजार नुकसान भरपाई देण्याचेही कोर्टाचे आदेश
अलिबाग : अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांनी दोषी ठरवले. एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना जिल्हा क्रीडासंकुलातील मतमोजणी केंद्रात घुसून पाटील यांनी कशाळकर यांना मारहाण केली. याप्रकरणी २४ मे २०१९ रोजी जयंत पाटील, पंडित ऊर्फ सुभाष पाटील आणि अभिजीत कडवे यांच्यावर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबाग पोलिस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांच्या न्यायालयात सुरू होती. सुनावणीदरम्यान एकूण १३ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात फिर्यादी, अंमलदार, पंच आणि साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.