शाहरूखच्या मुलीला खोटेंनी ठेवले अंधारात; जमीन खरेदी व्यवहारात ‘शर्तभंग’ झाल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 05:47 IST2025-09-17T05:47:18+5:302025-09-17T05:47:18+5:30

अलिबाग तहसीलदार यांनी गाव अभिलेखाची पडताळणी केली असता जिल्हाधिकारी यांच्या १ जुलै १९६८ आदेशानुसार नारायण खोटे यांना ही जमीन लागवडीसाठी प्रदान केल्याचे दिसून आले.

Shah Rukh's daughter kept in the dark by liars; 'Breach of terms' in land purchase deal revealed | शाहरूखच्या मुलीला खोटेंनी ठेवले अंधारात; जमीन खरेदी व्यवहारात ‘शर्तभंग’ झाल्याचे उघड

शाहरूखच्या मुलीला खोटेंनी ठेवले अंधारात; जमीन खरेदी व्यवहारात ‘शर्तभंग’ झाल्याचे उघड

अलिबाग : शाहरूख खान यांची मुलगी सुहाना खान हिचा थळ येथील जमीन खरेदीचा व्यवहार अडचणीत सापडला आहे.  तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत जमिनीच्या मूळ अटी-शर्तींचा भंग झाल्याचे उघडकीस आले आहे, मात्र व्यवहार करताना सुहाना हिलाही अंधारात ठेवून खोटे कुटुंबीयांनी तिची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणात ‘शर्तभंग’ झाल्याचा उल्लेख तहसीलदारांनी अहवालात केला आहे.

काय आहे प्रकरण?

अलिबाग तहसीलदार यांनी गाव अभिलेखाची पडताळणी केली असता जिल्हाधिकारी यांच्या १ जुलै १९६८ आदेशानुसार नारायण खोटे यांना ही जमीन लागवडीसाठी प्रदान केल्याचे दिसून आले.

मूळ शेतीसाठी दिलेल्या जमिनीवर अशी बांधकामे असल्याने ‘शर्तभंग’ झाल्याचा उल्लेख अहवालात आहे.

काय होती अट  

नारायण खोटे यांना शासनाकडून थळ येथील जमीन लागवड आणि वापरासा दिली होती. ती देताना जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गहाण, विक्री अथवा इतरांच्या नावावर करता येणार नाही, अशी अट होती; मात्र खोटे यांच्या वारसांनी सुहाना हिला नोंदणीकृत साठे कराराद्वारे विकल्याचे समोर आले. या विक्री व्यवहारावर  ॲड. विवेक ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी सुरू करून तहसीलदारांना याप्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी जारी केले होते.

Web Title: Shah Rukh's daughter kept in the dark by liars; 'Breach of terms' in land purchase deal revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.