शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपुरात भीषण पाणीटंचाई ३१ गावे, ६६ वाड्यांसाठी सात टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:27 IST

पोलादपूर : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे पाणी टंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या, या दुहेरी संकटाचा सामना पोलादपूरवासीयांना करावा ...

पोलादपूर : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे पाणी टंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या, या दुहेरी संकटाचा सामना पोलादपूरवासीयांना करावा लागत आहे. पोलादपूर तालुक्यातील ३१ गावे ६६ वाड्यांसाठी तालुक्यात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली. पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश टंचाई निवारण आराखड्यात करण्यात आला होता. यापैकी सद्य:स्थितीत ३१ गावे ६६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तालुक्यातील प्रलंबित धरणाचे काम मार्गी लागले नसल्याने व पाण्याबाबत कोणीच जागृत नसल्याने वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक, गावागावांतील कूपनलिका नळपाणी योजना यांची देखभाल करून मृत पाणीसाठा जीवित करणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील पाणी अडविल्यास व ते जमिनीत मुरवल्यास भूगर्भात पाणी साचून उन्हाळ्याच्या दिवसांत ते पाणी कूपनलिकांद्वारे उपलब्ध होईल. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच नियोजनाअभावी लाखो रुपये टंचाईवर खर्ची होत आहेत.

या टंचाईग्रस्त ७० गावे-वाड्यांमध्ये केवनाळे, चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताह्माणे, आड, दाभिल, सडेकोंड, सडे, बोरघर, वाकण, नानेघोळ या गावांसह केवनाळे आंबेमाची, बोरघर बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, वडघर - दिवाळवाडी, सनसपेढा, पवारवाडी, उलालवाडी, सणसवाडी, फौजदारवाडी तर कामथे येथील जांभडी, फौजदारवाडी, शेंबिवाडी, आदिवासीवाडी, देऊळवाडी कीनेश्वर, मोरसाडे गावातील आदी वाड्यांना सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

३१ गावे ६६ वाड्या अशा एकूण ९७ गावे-वाड्यांना सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईग्रस्त कोणतेही गाव, वाडी पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी तालुका प्रशासनाने सर्व उपाययोजना केली आहे. सद्य:स्थितीत नवीन मागणी नाही. १ गाव व ९ वाड्यांना येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पोलादपूर पंचायत समिती, पाणीपुरवठा विभागाकडून
जी. ई. कांबळे यांनी सांगितले.