ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा राज्य सरकारच्यावतीने सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 07:09 IST2019-05-15T01:15:12+5:302019-05-15T07:09:23+5:30
राज्य सरकारचे स्वच्छतादूत ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी पिरांचे देऊळ (रेवदंडा) येथील त्यांच्या निवासस्थानी राज्य सरकारच्या वतीने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा राज्य सरकारच्यावतीने सत्कार
अलिबाग : राज्य सरकारचे स्वच्छतादूत ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी पिरांचे देऊळ (रेवदंडा) येथील त्यांच्या निवासस्थानी राज्य सरकारच्या वतीने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांच्या समवेत सचिनदादा, उमेशदादा धर्माधिकारी व रायगड जिल्हा भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाहक चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, महाडचे आमदार भरत गोगावले, उरणचे आमदार मनोहर भोईर आदींसह समाजातील विविध मान्यवरांनी आवर्जून आप्पासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अभिवादन केले. राज्यातील सर्व बैठकांतील सर्व श्रीसदस्यांमध्ये आपल्या सद्गुरूंच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत उत्साही व चैतन्यदायी वातावरण होते.