शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

रामिष्टेंवर हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू

By admin | Updated: November 18, 2016 03:36 IST

अखिल भारतीय माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर मंगळवारी रात्री

पेण : अखिल भारतीय माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास पेण-खोपोली रस्त्यावरील योगीराज ढाबा येथे गोळीबार झाला. अज्ञात दोन मारेकऱ्यांनी त्यांना जीवे मारण्याची सुपारी घेतल्याचे गोळीबारातून निष्पन्न होत आहे. मुंबईचे गँगवॉर पेण शहरापर्यंत येवून ठेपल्याने या मारेकऱ्यांचा तपास घेण्यासाठी वेगवान हालचाली पोलीस यंत्रणेकडून सुरू झाल्या आहेत.मंगळवारी दिवंगत माथाडी कामगार नेते बाबूराव रामिष्टे यांच्या पुण्यस्मरण दिनाचा मुंबई वडाळा येथील निवासस्थानी कार्यक्रम आटोपून अविनाश रामिष्टे नागोठणे येथे सुप्रीम पेट्रोकेम लि. कंपनीमधील आमडोशी गावाजवळ युनियनच्या ५१ कामगारांना टी शर्ट वाटप कार्यक्रमानिमित्त रायगड जिल्ह्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांच्यावर पाळत ठेवून मारेकरी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था व होणारी वाहतूककोंडी लक्षात घेवून मारेकऱ्यांना आपला हेतू साध्य करता आला नसावा. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. नागोठणे येथील कार्यक्रम आटोपून येताना रात्र झाल्याने पेण-खोपोली रस्त्यावर जेवण करण्यासाठी योगीराज ढाब्यावर गेले. जेवण उरकून मुंबईकडे परतताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या दोेघांनी ते स्कार्पिओ (गाडी नं. एमएच ४३ एआर १५५५) गाडीचे दार उघडून बसत असताना त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र या गोळीबाराच्या आवाजानेच त्यांचे अंगरक्षक एकनाथ ढाकणे सतर्क झाले आणि त्यांनी क्षणार्धात अविनाश रामिष्टे यांना सुरक्षा दिल्याने त्यांच्या दिशेने येणारी गोळी समोरच्या काचेला लागून गेली. यात कोणीही जखमी झाले नाही. मारेकरी अंधाराचा फायदा उठवीत पळून गेले. मात्र पोलीस यंत्रणा सतर्क झाली. डीवायएसपी जयसिंग तांबे, गुन्हे अन्वेषणचे जितेंद्र व्हनकोटी, पेण पीआय अशोक जगदाळे या अधिकाऱ्यांसह पोलीस फौजफाटा तत्काळ हजर झाला. पेण पोलीस ठाण्यात या अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माथाडी कामगार संघटनांमधील या नेत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने कामगारवर्गातसुद्धा खळबळ माजली आहे. या गुन्ह्याचा तपास पेण पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे करीत आहेत. (वार्ताहर)