शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थीचा शोध सुरू; शासन करणार कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 1:10 AM

निराधारांसाठी योजना, अनेक जण बोगस लाभार्थी बनून शासनाची फसवणूक करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना गावपातळीवर या बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

निखिल म्हात्रे

अलिबाग : निराधारांसाठी आधार मिळावा म्हणून सरकारने विविध योजनांतर्गत निराधार लाभार्थ्यांना दरमहा वेतन दिले जाते. मात्र, शासनाच्या या योजनांचा अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा लाभार्थ्यांचा शासनातर्फे शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून, बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी योजनेंतर्गत निराधार व्यक्तींना दरमहा एक हजाराचे वेतन थेट या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते, तसेच विधवा, दिव्यांग, अनाथ व परितक्ता आदी लाभार्थ्यांनाही संजय गांधी निराधार योजनेंतर्गतच वेतन दिले जाते. या लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरच रक्कम जमा केली जात होती. या रकमेचा या निराधारांना मोठा हातभार लागत आहे. 

मात्र, अनेक जण बोगस लाभार्थी बनून शासनाची फसवणूक करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना गावपातळीवर या बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित तहसील प्रशासनातर्फे ग्रामसेवक व तलाठ्यांना आदेश देऊन अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे.

दर महिन्याला याबाबत बैठक घेतली जाते. या बैठकीत जिल्ह्यातील तहसीलदारांना कुणी बोगस लाभार्थी निदर्शनास आल्यास तात्काळ चौकशी करून संबंधित लाभार्थ्याने फसवणुकीने मिळविलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश आहेत. बोगस लाभार्थ्यांविरोधात प्रशासनाची कारवाई मोहीम सुरूच राहणार आहे. - निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

संजय गांधी योजना (अनाथ)शासनातर्फे संजय गांधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनाथ बांधवांनाही दरमहा एक हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जात आहे. जिल्ह्यातील या लाभार्थ्यांच्या यादीतच अनाथ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

संजय गांधी योजना (परितक्त्या)शासनातर्फे परितक्त्या लाभार्थ्यांनाही दरमहा एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जात आहे. या लाभार्थ्यांचे वेतन दरमहा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.