समुद्र किनाऱ्याची सफाई
By Admin | Updated: August 3, 2015 03:50 IST2015-08-03T03:50:52+5:302015-08-03T03:50:52+5:30
जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अलिबाग समुद्र किनाऱ्याची रविवारी स्वच्छता केली. स्वच्छ भारत

समुद्र किनाऱ्याची सफाई
अलिबाग : जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अलिबाग समुद्र किनाऱ्याची रविवारी स्वच्छता केली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.
सकाळी आठ वाजता अलिबाग समुद्र किनारी या अभियानाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. या मोहिमेत सुमारे ५०० अधिकारी, कर्मचारी विविध संघटना, महाविद्यालये सहभागी झाले होते. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील कचरा गोळा करण्यासाठी २०-२० चे गट करण्यात आले होते. गोळा केलेला कचरा अलिबाग नगर पालिकेच्या वाहनातून वाहून नेण्यात येत होता.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी सुभाष मोळावणे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)