शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंदच; पालकांच्या मनात चलबिचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:19 AM

शिक्षकांची चाचणी, शाळेचे सेनिटायझेशन बाकी

वैभव गायकरपनवेल : पनवेल पालिका क्षेत्रातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याची परवानगी आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिली होती. मात्र शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली नाही. तसेच पालकांच्या मनातही चलबिचल असल्याने आजपासून सुरू होणाऱ्या शाळा सुरू होण्यास फेब्रुवारी महिना उगवणार असल्याचे दिसून येत आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. पालिकेच्या स्वतःच्या १० शाळांसह संपूर्ण पालिका क्षेत्रात सर्वच माध्यमांच्या २५० पेक्षा जास्त शाळा आहेत. कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून २७ जानेवारीपासून या शाळा सुरू करण्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे म्हटले होते. मात्र अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये गोंधळ कायम असल्याने शाळा सुरू होण्यास उशीर लागणार असल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोविड टेस्ट, शाळांचे सॅनिटायझेशन आदी बाबी पूर्ण करणे गरजेचे असल्याने शाळा या तयारीला लागल्या आहेत. याव्यतिरिक्त शाळा सुरू करण्यास पालक, मुलांची काहीच हरकत नसल्याचे संमतीपत्र शाळा लिहून घेत असल्याने या संपूर्ण प्रक्रियेला आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे संमतीपत्र शाळा सुरू झाल्यावर कोविडची साथ पसरली अथवा विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्यास त्याला शाळा प्रशासन जबाबदार नसल्याचे संमतीपत्र पालकांकडून लिहून घेतले जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाल्यास शाळा प्रशासन हात झटकण्यास मोकळे असणार आहे.

गोखले शाळेतील विद्यार्थ्यांचे काय?शाळा सुरु करण्यास पालिकेने परवानगी दिली असली तरी खारघरच्या गोखले शाळेत अद्यापही तळोजा कारागृहातील२०० पेक्षा जास्त कैदी ठेवले आहेत. जो पर्यंत त्याठिकाणच्या कैद्यांना इतरत्र हालवत नाही तो पर्यंत शाळा कशी सुरु करणार? असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे.

महानगरपालिकेच्या मालकीच्या दहा शाळा  पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण दहा शाळा आहेत. या शाळेतील शिक्षकांनी आपली कोरोना चाचणी केली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याने शाळा २७ पासून सुरू झाल्या नसल्याची माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब चिमणे यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळाpanvelपनवेल