शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

घरकूल योजनेत घोटाळा

By admin | Updated: August 9, 2015 23:21 IST

ग्रामपंचायतीकडे इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत ७४ गरीब कुटुंबांनी नवीन घरांचे बांधकाम करण्यासाठी अर्ज केले होते. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या ७४ पैकी ३७ बोगस लाभार्थ्यांनी ग्रामसेवकाला

रोहा : ग्रामपंचायतीकडे इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत ७४ गरीब कुटुंबांनी नवीन घरांचे बांधकाम करण्यासाठी अर्ज केले होते. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या ७४ पैकी ३७ बोगस लाभार्थ्यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून शासनाची दिशाभूल करीत नवीन घरे न बांधता त्या ठिकाणी असलेल्या जुन्या नादुरुस्त घरांची डागडुजी, रंगरंगोटी करून लाखो रुपयांचा मलिदा हडप केल्याचा धक्कादायक प्रकार रोहा तालुक्यातील भातसई ग्रामपंचायतीत घडला आहे. या घरकूल घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी भातसई ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोतवाल यांनी केली आहे.रोहा तालुक्यातील भातसई, वरवडे, पाले, झोळांबे, लक्ष्मीनगर या ग्रुप ग्रामपंचायतीने २०१४-१५ या वर्षात येथील ७५ ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे इंदिरा आवास घरकूल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रीतसर अर्ज करुन मागणी केली होती. भातसई ग्रामपंचायतीने संबंधित ग्रामस्थांचे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती कार्यालयात वर्ग केले. पंचायत समितीने या संबंधी अहवाल तयार करुन जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केले असता जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी ९३ हजार ५०० रु. लाभार्थींच्या खात्यात जमा केले. मात्र या लाभार्थ्यांपैकी ३७ लाभार्थी बोगस असून या योजनेत संबंधित ग्रामसेवकाने या लाभार्थ्यांशी संगनमत करुन शासनाचे लाखो रुपये लाटले आहेत, असा आरोप शेकापचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोतवाल यांनी केला आहे. या बोगस लाभार्थ्यांनी आपल्या जुन्या घरांची मलमपट्टी करुन शासनाची दिशाभूल केली आहे. या घरकूल घोटाळ्यात संबंधित ग्रामसेवक दोषी असून ग्रामपंचायत सदस्य कोतवाल यांनी या विषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, आ. पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती, रोहा पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करुन या घरकूल घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)