सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 11:23 AM2020-08-04T11:23:47+5:302020-08-04T11:48:03+5:30

नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

The Savitri River crossed the danger level, alerting the administration | सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Next
ठळक मुद्देसकाळी नऊच्या सुमारास ही पातळी  7.30 मीटर इतकी झाली असल्याची माहिती प्रशासनाने  दिली आहे.

रायगड : सावित्री नदीने धाेक्याची पाणी पातळी ओलांडल्याने त्या नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा दिला आहे, नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

सर्वसाधारणपणे सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी 6.50 मीटर आहे सद्य:स्थितीत ही धोका पातळी सावित्री नदीने ओलांडली आहे सकाळी नऊच्या सुमारास ही पातळी  7.30 मीटर इतकी झाली असल्याची माहिती प्रशासनाने  दिली आहे.

सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये, तसेच वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पाेल्स, स्विच बोर्ड,  इलेक्ट्रिक वायर्स  यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे.स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,  अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

आणखी बातम्या...

समुद्रात ५०० नौका अडकल्या, एक लाख मच्छीमारांचा जीव धोक्यात

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, रेल्वेही ठप्प!    

मुंबईत पावसाचे धूमशान, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतूक कोलमडली    

जोरदार पावसाने डोंबिवली शहराला झोडपले, चाकरमान्यांचे नियोजन कोलमडले  

Web Title: The Savitri River crossed the danger level, alerting the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड