शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

'साध्वी प्रज्ञा सिंह जेलबाहेर आल्या कशा?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 07:15 IST

जयंत पाटील यांची घणाघाती टीका

मुरुड : राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार जेव्हा महाराष्ट्रात होते, तेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह या जेलमध्ये होत्या; परंतु भाजप व शिवसेनेची सत्ता येताच त्या जेलबाहेर येतात. त्या जेलबाहेर कशा आल्या, त्यांना मुक्त कोणी केले याचा खुलासा राज्य सरकारने करणे खूप आवश्यक आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीस भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून खासदारकीचे तिकीट देऊन या गोष्टीचे समर्थन राज्याचे मुख्यमंत्री करीत असतील तर या राज्यकर्त्यांची नैतिकता लयास गेली आहे. संसदेत भगवे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारणाºया विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या या धोरणाला जोरदार विरोध करून मुंबईचे संरक्षण करीत असताना हेमंत करकरे हे शहीद झाले होते.त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण पोलीस दलाचा अवमान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी करून सुद्धा समर्थन करणाऱ्या भाजपला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुरुड शहराच्या जाहीर सभेत केले.या वेळी जयंत पाटील म्हणाले की, २८ टक्के जीएसटीमुळे संपूर्ण व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले असून जेव्हा मोदी सत्तेच्या बाहेर होते तेव्हा याच जीएसटीला विरोध केला होता. आमच्या काळात आम्ही व्हॅल्यू एडीट टॅक्सला सहमती दिली होती. हा टॅक्स व्यापारी वर्गाला परवडत होता; परंतु काही तरी वेगळे करून दाखवण्याच्या नादात एकतर्फी निर्णय घेऊन जीएसटी अमलात आणून संपूर्ण व्यापारी वर्गाची नाराजी ओढवून घेतली आहे. या महाराष्ट्रामधून शिवसेनेचे खासदार सर्वात कमी निवडून येणार आहेत. जे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नेतृत्व असताना जे बोलत होते तेच करीत होते; परंतु उद्धव ठाकरे आपली सारखी भूमिका बदलत आहेत. यामुळे सामान्य शिवसैनिक बुचकळ्यात सापडला असून तो शिवसेनेपासून दुरावला आहे.त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वात कमी खासदार निवडून येतील असे भाकीत त्यांनी केले. आमचे सरकार जर केंद्रात आले तर तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन दिलासा देऊ.२०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत भारत देशावर ३१ लाख कोटी रु पयांचे कर्ज चढले असून मी या सभेद्वारे मोदींना प्रश्न विचारू इच्छितो की हे ३१ लाख गेले कुठे? कशावर खर्च करण्यात आले याचा देशातील जनतेला हिशोब द्या. या सरकारने मेक इन इंडिया नावाचा कार्यक्र म राबवला; परंतु याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.भाजपचे सरकार फसवे असून खरी माहिती लोकांपुढे आणत नाही. या देशातून कर्ज बुडवणाºयांची संख्या ३६ असून फक्त प्रसार माध्यमांसमोर विजय मल्ल्या, नीरव मोदी यांचीच नावे दाखवली जात आहेत;परंतु सुप्रीम कोर्टात अंमलबजावणी संचालनालय यांनी ३६ लोकांनी बँकांना डुबवल्याचा अहवाल सादर केला आहे. अफरातफर करून लोक विदेशात पळून जात असतील तर या देशाचा चौकीदार म्हणवणारे पंतप्रधान काय करीत आहेत असा प्रश्न या वेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. या वेळी रायगड जिल्हा काँग्रेस आयच्या महिला अध्यक्ष श्रद्धा ठाकूर, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, शेकाप तालुका चिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष सुभाष महाडिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरJayant Patilजयंत पाटील