सुधागडात गोवंश हत्येमुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:47 IST2019-01-30T23:47:05+5:302019-01-30T23:47:52+5:30
गोवंश हत्याबंदीला काळिमा फासणाऱ्या प्रकारामुळे खळबळ

सुधागडात गोवंश हत्येमुळे खळबळ
पाली : सुधागड तालुक्यातील अतोणे ग्रामपंचायत हद्दीत दोन ते तीन गुरे कापलेले, तसेच एक बैल मृत अवस्थेत सापडल्याने गोवंश हत्येचा प्रकार समोर आला आहे. गोवंश हत्याबंदीला काळिमा फासणाऱ्या या प्रकाराने खळबळ माजली आहे.
मंगळवारी २९ जानेवारी रोजी सकाळी अतोणे गावातील ग्रामस्थ जयवंत देशमुख व काही ग्रामस्थांची गुरे घरी न आल्याने शोध घेतला असता एका शेतामध्ये दोन ते तीन गुरांचे आतडे, पिशव्या, रक्त त्या शेतामध्ये आढळून आले. जवळ एक पाय कापलेला बैल मृतावस्थेत आढळून आला. हे पाहताच जयवंत देशमुख यांनी अतोणे गावचे सरपंच रोहन दगडे व गाव कमिटी अध्यक्ष सखाराम जमादार यांना याबाबत माहिती दिली. सरपंचांनी पाली पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाली पोलिसांनी पंचनामा के ला.