रोहित शर्मा अलिबागेत; राष्ट्रवादीचे अमित नाईक यांच्या बाप्पाचे पत्नीसह घेतले दर्शन 

By राजेश भोस्तेकर | Updated: September 22, 2023 14:19 IST2023-09-22T13:12:04+5:302023-09-22T14:19:55+5:30

अमितदादा नाईक राष्ट्रवादीचे मुरुड चणेरा मतदार संघाचे अध्यक्ष 

Rohit Sharma in Alibag; NCP's Amit Naik's father was seen with his wife | रोहित शर्मा अलिबागेत; राष्ट्रवादीचे अमित नाईक यांच्या बाप्पाचे पत्नीसह घेतले दर्शन 

रोहित शर्मा अलिबागेत; राष्ट्रवादीचे अमित नाईक यांच्या बाप्पाचे पत्नीसह घेतले दर्शन 

अलिबाग : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... या जयघोषाने सार्वजनिक गणपती बाप्पांसोबत घरगुती बाप्पा देखील विराजमान झाले आहेत. याचबरोबर अलिबाग- मुरुड चणेरा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमित नाईक यांच्या अलिबाग येथील म्हात्रोळी निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हे अलिबाग मध्ये आले असता. शर्मा यांनी अमित नाईक यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे सपत्नीक दर्शन घेतले. 

रायगड जिल्ह्यात सध्या गणेशोत्सव सणाची धूम सुरू आहे. सेलिब्रिटी सुध्दा गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळतात. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मा हे अलिबागकर झाले आहेत. गुरुवारी रोहित शर्मा हे सपत्नीक अलिबाग मध्ये दाखल झाले होते. यावेळी रोहित शर्मा यांनी म्हात्रोळी येथे अमित नाईक यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी चाहत्यांना त्याच्या सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Web Title: Rohit Sharma in Alibag; NCP's Amit Naik's father was seen with his wife