मोहोपाडा बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:47 IST2017-08-05T02:47:29+5:302017-08-05T02:47:29+5:30

रसायनी पाताळगंगा परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मोहोपाडा शहराच्या बाजारपेठेतील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

 Road to the Mohopada Market | मोहोपाडा बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था

मोहोपाडा बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था

मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मोहोपाडा शहराच्या बाजारपेठेतील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोहोपाडा थांब्याच्या प्रवेशव्दारापासून शिवाजी चौक ते वासांबे ग्रामपंचायत कार्यालय येथील पेव्हर ब्लॉक रस्त्याला खड्डे पडून त्याची बिकट अवस्था झाल्याने बाजारात आलेल्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील पेव्हर ब्लॉक रस्त्याला खड्डे पडून त्यात पाणी साचत असल्याने वाहन गेल्यास बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडाल्याने बाचाबाची होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. तसेच बाजारहाट करीत असताना रस्त्यावरील खड्ड्यात पाय मुरगळून काही नागरिकांना इजा होण्याचे प्रकार ही अनेक वेळा घडले आहेत. तरी संबंधितांनी रस्त्याचे काँक्र ीटी करण करून बाजारहाट करणाºया नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title:  Road to the Mohopada Market