शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

लहरी हवामानामुळे भातशेतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:20 IST

कृषी विभाग सतर्क; रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

- गणेश प्रभाळे दिघी : श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यात मंगळवार २४ सप्टेंबरपासून अचानक सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगडवासीयांची तारांबळ उडाली. यामुळे भातपिकाला नुकसानीचा तडाखा बसत आहे.यावर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल म्हणून शेतकरी खूश होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यात भातशेतीची दाणादाण उडाली आहे. पुढील पंधरवड्यात तयार होणारी भातशेती कापणीयोग्य असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार पडणाऱ्या पावसामुळे उभे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सप्टेंबर महिना अर्धाअधिक संपत आला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. दिवसभरात व सायंकाळच्या सुमारास वर्दी देणारा परतीचा पाऊस सतत पडत असल्याने भातपिकाला नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव तसेच महाड तालुक्यातील चांगल्या भातशेतीला परतीच्या पावसाने धोका निर्माण केला आहे. समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबी वर आली आहे. अनेक ठिकाणी शेती कापण्यायोग्य झाली आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने पिकलेली भातशेती आडवी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसºया बाजूला वन्यप्राण्यांकडून अशा शेतीचे नुकसान केले जात आहे. वानर, डुक्कर शेतीमध्ये घुसून नुकसान करत आहेत. त्यामुळे बळीराजा धास्तावला होताच. त्या जोडीला परतीच्या पावसाने काही ठिकाणची भातशेती धोक्यात आली आहे.यावर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल. सध्या समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबीवर आली आहे. भाताबरोबर असलेले बाजूचे गवत काढण्याचे (बेरणी) काम सुरू आहे. पुढील पंधरवड्यानंतरही भातशेती कापणीयोग्य होईल. मात्र, सध्या पडणाºया पावसाचा जोर कायम राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.- चंद्रकांत धुमाळ, मेंदडी कोंड, म्हसळालहरी हवामानामुळे भातशेतीवर रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच शेतकºयांना फवारणी करण्याची सूचना देतो. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी तशी माहिती अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे.- शिवाजी भांडवलकर, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन